उल्हासनगर दि. ६ ( प्रमोद दळवी ) : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळील कृष्णा दूध डेरी जवळ ५५ वर्षीय एक अनोळखी इसम निश्चित पडलेला अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता. त्याला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.
मयत इसमाचा मृत्यू कोणत्यातर आजाराने झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो अनोळखी इसम अंदाजे ५५ वर्षे वयोगटाचा असून, अंगाने सडपातळ चेहरा उभट, नाक सरळ, रंग नीमगोरा, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले. व दाढी काळी पांढरी वाढलेली, उंची ५/५ फूट, मताच्या उजव्या हाताच्या दंडावर हनुमानाचे चित्र व डाव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले, मयताच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट व पायात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट त्यांनी घातली होती. जवळपास एक वर्ष होऊन गेले तरी त्या अनोळखी मयत इसमाची अद्याप पर्यंत ओळख पटली नसून त्याच्या नातेवाईकांचाही शोध विठ्ठलवाडी पोलीस घेत आहेत. या अनोळखी इसमा बाबत कोणाला माहिती असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत काहीही माहिती असल्यास त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आव्हान तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक अरुण दुबळे यांनी केले आहे





























