Homeशहरअंबरनाथ पोलिसांची मोठी कारवाई ; ८६ हजार रुपयांचा साडेतीन किलो गांजा...

अंबरनाथ पोलिसांची मोठी कारवाई ; ८६ हजार रुपयांचा साडेतीन किलो गांजा जप्त, एकाला अटक, दुसरा फरार

अंबरनाथ दि. २१ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत तब्बल ३,.४५७  किलो गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत ८६ हजार ४२५ रुपये  आहे. या प्रकरणी एक आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींविरुद्ध एनडीपीएस अधिनियम १९८५  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिम येथील शास्त्रीनगरमधील कैकाडी समाज मंदिराजवळील अरुंद गल्लीत गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी स्कॉड आणि एनडीपीएस स्कॉडने संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आशिष मारुती गायकवाड (२८ ), रा. शास्त्रीनगर, अंबरनाथ पश्चिम) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गांजा अशोक रोकडे (रा. संजयनगर, साई मंदिराजवळ, उल्हासनगर-3) याच्याकडून विक्रीच्या उद्देशाने खरेदी करून स्वतःच्या ताब्यात ठेवल्याची माहिती समोर आली.

छाप्यात आरोपीच्या घरातून १.९९१  किलो गांजा (किंमत ४९  हजार ७७५  रुपये) तसेच १.४४६  किलो गांजाचा चुरा (किंमत ३६  हजार ६५०  रुपये) असा एकूण ८६,४२५ किलो प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त करण्यात आला. याशिवाय गांजाच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर पॅकिंग साहित्यही पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७०/२०२६  नोंद करण्यात आला असून आरोपींविरुद्ध एनडीपीएस अधिनियम १९८५  च्या कलम ८ (क), 20(ब)(ii)( ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे, अविनाश गायकवाड, दत्तात्रय जाधव, सुप्रिया देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रोहित बनगी, दत्ता जाधव, समीर गायकवाड, मोडक तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी सांगितले की, अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्रीनगर परिसरात एका घरात एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रतिबंधित असलेला गांजा साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अंबरनाथ पोलीस ठाणे आणि विभागीय पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ८६ हजार ४२५  रुपये आहे. या प्रकरणात दोन आरोपी निष्पन्न झाले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. जप्त केलेला गांजा आरोपीच्या घरातून हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि अवैध कारभाराविरोधातील विशेष मोहीम या  पुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जानेवारी-जुलै दरम्यान कॅब नोंदणीने पुण्यातील ऑटोरिक्षांना मागे टाकले आहे

या वर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान पुण्यात 5,000 हून अधिक कॅबची नोंदणी झाली असून, याच कालावधीत 4,400 ऑटोरिक्षांची नोंदणी झाली आहे. पुणे :...

विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आदिनाथ पालवे यांनी साजरा केला वाढदिवस

उल्हासनगर दि. २१ ( प्रमोद दळवी )  : वाढदिवस हा समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा संदेश देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख आदिनाथ पालवे...

‘हे लाजिरवाणे आहे’: व्हायरल क्लिप समोर आल्यानंतर अर्जेंटिनाचे विश्वचषक अंतिम आचार ताज्या छाननीखाली

अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिस (२४) याला लाल कार्ड दाखविल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी विरोध केला (एपी फोटो) एंझो फर्नांडीझच्या निर्णायक रेड कार्डच्या परिणामावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न...

बोरिवलीत दुचाकीस्वाराला टाळताना बेस्ट बसने दुभाजक लावले, कोणतीही दुखापत झाली नाही

मुंबई: बोरिवली पूर्व येथे सोमवारी रात्री उशिरा बेस्टची बस रस्त्याच्या दुभाजकावर अडकली. दौलत नगर बसस्थानकाजवळ रात्री 11.20 च्या सुमारास ही घटना घडली...

पुणे खून प्रकरण: लग्नाला उशीर करण्यासाठी सिया आणि चेतनने सुरुवातीला केतनला जखमी करण्याची योजना...

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालच्या लग्नाला उशीर करण्यासाठी त्याला जखमी करण्याची योजना आखली पुणे: सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर,...

error: Content is protected !!