Homeशहरमुसळधार पावसाने अंबरनाथमध्ये घर नाल्यात कोसळले : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची...

मुसळधार पावसाने अंबरनाथमध्ये घर नाल्यात कोसळले : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची तातडीने धाव, बाधित कुटुंबाला आर्थिक मदत

अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्व येथील कोकण नगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. परिसरातील रहिवासी प्रतीक विसपुते यांचे घर अचानक खचून थेट लगतच्या नाल्यात कोसळल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घरासह संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विसपुते कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले असून त्यांच्यासमोर आर्थिक आणि जगण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कोणताही विलंब न करता स्थानिक विभाग प्रमुख सचिन गुडेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दुर्घटनाग्रस्त घराची पाहणी करून विसपुते कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच या कठीण प्रसंगी त्यांना धीर दिला. यावेळी आमदार डॉ. किणीकर यांनी अंबरनाथच्या तहसीलदारांशी थेट संपर्क साधून घटनेचा तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तसेच शासनाच्या आपत्ती निवारण योजनेंतर्गत बाधित कुटुंबाला शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.

शासकीय मदतीची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी स्वतःच्या वतीने विसपुते कुटुंबाला वैयक्तिक आर्थिक मदतही प्रदान केली. या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्याबरोबरच या कठीण काळात समाजातील लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना निर्माण झाली. दरम्यान, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी विसपुते कुटुंबाला शासनाकडून मिळणारी सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रशासनाच्या सतत संपर्कात राहणार असल्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी त्यांनी संकटाच्या काळात नागरिकांना धीर देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असल्याचेही नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरातील सात मजली ‘आशालोक’ इमारतीला भीषण आग : ४९ फ्लॅटधारकांची सुखरूप सुटका, आठ दुचाकी...

उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प - ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह...

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह...

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं - १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील पॅनल...

उल्हासनगरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर शहरात सभासद नोंदणी अभियानाला सोमवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली....

गल्लीमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटवण्यासाठी मानपाडा पोलिसांचे आवाहन

डोंबिवली  दि. ३ ( प्रमोद दळवी )  : डोंबिवली पूर्व येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा परिसरात एका गल्लीमध्ये सुमारे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा...

error: Content is protected !!