साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी ) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील पॅनल क्रमांक ७, गरीबनगर, महात्मा गांधीनगर, उल्हासनगर-२ येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

संसदरत्न तथा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि शिवसेना विभागप्रमुख श्री ज्ञानेश्वर मरसाळे (माऊली) यांच्या सहकार्याने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटक सक्षम व्हावा, या उद्देशाने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या प्रसंगी सुभाष मरसाळे, दिलीप अवसरे, अशोक उमाप, गणेश साळवे, रवींद्र सौदागर, हरी पवार, कल्याण थोरात, शंकर मरसाळे, अजय नन्नवरे, शालिक साळवे, ज्ञानेश्वर पाटोळे, अरुण पवार, संतोष वाहूळ, प्रकाश ससाणे, प्रितेश तरे, श्रीकांत डावरे, प्रकाश पवार, योगेश सुरवसे, बाळू भोसले, आकाश कांबळे, आकाश साळवे, अखिल मणियार यांच्यासह अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























