Homeशहरसीएसएमटी - सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेसला मंजुरी

सीएसएमटी – सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेसला मंजुरी

कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश

पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवास होणार अधिक सुलभ

कल्याण  दि. १ : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी या सेवेसाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या निर्णयामुळे कोकणातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत भारतीय रेल्वेने या नवीन सेवेचा निर्णय घेतला असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत मंजुरी दिली आहे. या निर्णयाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोकण रेल्वेवरील प्रवाशांची वाढती गर्दी, नवीन रेल्वे सेवेची आवश्यकता आणि मुंबई – कोकण दरम्यान अधिक सक्षम रेल्वे संपर्क निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची वेळोवेळी भेट घेत विविध मागण्या मांडल्या होत्या. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत कोकण रेल्वे मार्गावर नवीन दैनिक रेल्वे सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली होती. या मागणीला तातडीने मंजुरी देण्यात आली असून, केंद्र सरकारकडून या  निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.नवीन रेल्वे सेवा गाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावाने दररोज धावणार आहे. या गाडीचे सविस्तर वेळापत्रक भारतीय रेल्वेकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.सुमारे ५१० किलोमीटर अंतरावरील या मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील प्रमुख शहरांदरम्यान थेट, सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यापार तसेच सामाजिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना या नव्या सेवेचा मोठा लाभ होईल.

कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्ग पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार असून, पर्यटन उद्योगाला नवी चालना मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सेवा मोठी सोय ठरणार आहे. वाढलेली प्रवासी क्षमता, सुलभ वाहतूक आणि सुधारलेली कनेक्टिव्हिटी यामुळे कोकणातील स्थानिक अर्थव्यवस्था, उद्योग आणि व्यवसायालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवीन दैनिक एक्सप्रेसचे प्रस्तावित थांबे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून उल्हासनगरकरांना विशेष भेट; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचे जयंतीदिनी...

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी )  : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरच्या पॅनेल क्रमांक १२ मधील के.बी. रोड, आनंदनगर येथे उभारण्यात...

रिक्षा युनियनचे वार्षिक सदस्यत्व अभियान सुरू; अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांचे रिक्षाचालक-मालकांना संघटनेत सहभागी...

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी )  : रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटना, उल्हासनगर यांच्या वतीने १ ऑगस्ट २०२६ पासून वार्षिक सदस्यत्व अभियानाचा शुभारंभ...

मेरा भारत ठाणे व नशाबंदी मंडळातर्फे ‘नशा मुक्त युवा, विकसित भारतासाठी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि. ३१  : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा विभागांतर्गत मेरा भारत ठाणे आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रसारक...

महापौर अश्विनी निकम यांचा पॅनल क्रमांक १५ मध्ये पाहणी दौरा; ३० सेक्शन रस्त्याचे काम...

उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील प्रभाग (पॅनल) क्रमांक १५ मधील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी महापौर अश्विनी निकम यांनी...

डेंग्यू प्रतिबंध महिन्यानिमित्त संघवी हिल्स ठाणे येथे जनजागृती व आरोग्य उपक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि. ३१ : डेंग्यू प्रतिबंध महिन्यानिमित्त आनंदनगर आरोग्य केंद्रांतर्गत संघवी हिल्स येथे व्यापक आरोग्य जनजागृती व डास नियंत्रण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या...

error: Content is protected !!