Homeशहरदिल्लीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राजेंद्र चौधरी यांची सदिच्छा भेट; ...

दिल्लीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राजेंद्र चौधरी यांची सदिच्छा भेट; उल्हासनगरातील पहिली क्लस्टर डेव्हलपमेंट व बोट क्लब विकासासाठी निवेदन

उल्हासनगर दि . ३० ( प्रमोद दळवी )  : शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी शिवसेना महानगर प्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उल्हासनगर शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर, कैलास तेजी आणि युवराज भदाणे हे देखील उपस्थित होते.

भेटी दरम्यान उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मधील विठ्ठलवाडी, खन्ना कंपाऊंड परिसरात शहरातील पहिली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या माध्यमातून राबविण्यात यावी, अशी मागणी करणारे सविस्तर लेखी निवेदन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सादर करण्यात आले. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लागून नागरिकांना सुरक्षित, आधुनिक आणि नियोजनबद्ध घरे उपलब्ध होतील  तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.याशिवाय उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १० मधील बोट क्लबचा शासनाच्या निधीतून सर्वांगीण विकास करण्यात यावा यासाठीही स्वतंत्र लेखी निवेदन देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची मनपा शाळा क्र. २४ ला भेट; ‘घे भरारी’...

उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी  गुरवारी दि. ३० जुलै रोजी महानगरपालिकेच्या 'घे भरारी'...

समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे अभिनेते महेश्वर तेटांबे यांना ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित

मुंबई दि.३० ( प्रमोद दळवी )  : आपल्या प्रभावी अभिनयातून, सामाजिक आशयपूर्ण लेखणीतून आणि निरपेक्ष समाजसेवेतून समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, लेखक व...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

बदलापूरात ‘लाडक्या खड्ड्याचा’ तिसरा वाढदिवस साजरा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन

बदलापूर दि.३० ( प्रमोद दळवी )  : बदलापूर शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी अनोखे...

अंबरनाथमधील उड्डाणपुलावरील खड्ड्यांविरोधात नागरिकांचा अनोखा एल्गार; खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून आंदोलन, चार दिवसांत दुरुस्तीची...

अंबरनाथ दि.३० ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ शहरातील उड्डाणपुलावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात नागरिकांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडत...

error: Content is protected !!