Homeशहरउल्हासनगरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उल्हासनगरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर शहरात सभासद नोंदणी अभियानाला सोमवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कल्याण लोकसभा जिल्हा संघटक ॲड.कल्पेश माने आणि उल्हासनगर शहर अध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाचा शुभारंभ कॅम्प क्र. ३ येथील आर. के. तलरेजा महाविद्यालयातून करण्यात आला.

अभियानाच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सभासदत्व स्वीकारत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असतानाही विद्यार्थ्यांचा उत्साह कायम राहिल्याने पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्यासह जिल्हा व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत संघटनेच्या उद्दिष्टांबाबत माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विविध हक्कांसाठी संघटना सातत्याने कार्यरत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सोमवारपासून सुरू झालेली ही सभासद नोंदणी मोहीम आता उल्हासनगर शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा संघटक ॲड. कल्पेश माने आणि शहर अध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली. “विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघटित होणे ही काळाची गरज असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य होऊन या अभियानात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले. या सभासद नोंदणी अभियानाला विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आगामी काळात शहरातील विविध महाविद्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणावर नोंदणी होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह...

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं - १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील पॅनल...

गल्लीमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटवण्यासाठी मानपाडा पोलिसांचे आवाहन

डोंबिवली  दि. ३ ( प्रमोद दळवी )  : डोंबिवली पूर्व येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा परिसरात एका गल्लीमध्ये सुमारे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा...

उल्हासनगरात शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीन दिवसीय मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा...

उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी )  : शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाप्रमुख गोपाळ...

स्वराज्य संघटनेच्या तक्रारीनंतर मशीनद्वारे मॅनहोल साफसफाई; अधिकारी व ठेकेदारांनी कामगाराlला जाणीवपूर्वक मॅनहोलमध्ये उतरविल्याचा...

उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या समता नगर, उल्हासनगर-४ येथील मॅनहोलमध्ये २९ जुलै २०२६ रोजी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष मॅनहोलमध्ये...

error: Content is protected !!