Homeमहाराष्ट्रनवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

– खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार

नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा आज नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षाच्या वतीने सर्व खासदारांच्या उपस्थितीत तसेच कोकणवासीयांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागलेल्या या रेल्वे सेवेसाठी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या, विशेषतः गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात चाकरमान्यांची होणारी मोठी गर्दी तसेच मुंबई आणि कोकणदरम्यान अधिक सक्षम रेल्वे संपर्काची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन नियमित एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला भारतीय रेल्वेने मंजुरी दिल्यानंतर आता ही गाडी नियमितपणे धावणार आहे. या नव्या रेल्वे सेवेसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानण्यासाठी हा सत्कार करण्यात आला.

मुंबई आणि कोकणदरम्यान नियमित रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी, ही कोकणवासीयांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. या मागणीची दखल घेत नवीन एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार. ही सेवा कोकणवासीयांसाठी निश्चितच मोठा दिलासा देणारी ठरेल,” अशी भावना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

नवीन एक्सप्रेसला अनेक स्थानकांवर थांबे देण्यात आले असून, त्यामुळे मुंबईपासून कोकणातील विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि नियमित प्रवाशांनाही वर्षभर या सेवेचा लाभ घेता येणार आहे.या रेल्वे सेवेमुळे मुंबई-कोकण प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होण्याबरोबरच कोकणातील पर्यटन, व्यापार, शिक्षण, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कोकणातील समुद्रकिनारे, धार्मिक व ऐतिहासिक स्थळे तसेच पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. यावेळी शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, खासदार संजय दिना पाटील, खासदार श्रीरंग बारणे, खासदार ओम राजे निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नवीन एक्सप्रेसचे प्रस्तावित थांबे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगर-१ यांच्या वतीने भव्य...

उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ कोटी २५ लाखांची सायबर फसवणूक उघड

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची तब्बल ५७ कोटी २५ लाख ४४ हजार २८४ रुपयांची सायबर फसवणूक केल्याचे...

स्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी  )  : स्वातंत्र्य दिन तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात...

उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : ८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख प्राथमिक आरोग्यसेवा उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, दर्जेदार...

उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय; Google Maps वर नजर ठेवत आता कंट्रोल रूममधून वाहतूक...

उल्हासनगर  दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली...

error: Content is protected !!