Homeताज्या बातम्याश्रावणमास प्रारंभ निमित्त श्रावण विशेष शिव चर्चा व भजन संध्या कार्यक्रम संपन्न...

श्रावणमास प्रारंभ निमित्त श्रावण विशेष शिव चर्चा व भजन संध्या कार्यक्रम संपन्न : महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग

उल्हासनगर  दि. १२( प्रमोद दळवी )  : शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) व शिवसेना सेंचुरी कॉलनी शाखेच्या वतीने पॅनल क्रमांक १ मध्ये श्रावणमास प्रारंभ निमित्त श्रावण विशेष शिव चर्चा व भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात भक्ती भावनेने संपन्न झाला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

श्रावण महिन्याच्या सुरुवाती निमित्त उल्हासनगरातील पॅनल क्रमांक १  मधील सीडीएस कॉलनी मध्ये भक्तिमय शिव चर्चा आणि भजन संध्या कार्यक्रमात स्थानिक महिलांनी सहभागी होऊन श्रद्धा आणि भक्तीने शिव शंकराची पूजा केली. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेविका सौ.परमिंदरकौर भुल्लर,शिवसेना उपशहर संगठक सौ.पूनम यादव,सौ.सोनी खैरे,विभाग संगठक सौ.सविता कुंभार,उपविभाग संगठक सौ.गीता शुक्ला समाजसेविका सौ.कामिनी सिंह,सौ.पुष्पा मिस्त्री,सौ.गीता सिंह यांच्या सहभागाने कार्यक्रम अधिकच भव्य झाला. संपूर्ण कार्यक्रमात हर हर महादेवाच्या नावाने भजनाच्या मधुर आवाजाने आणि भगवान शिव शंकराच्या महिम्याच्या अनुभूतीने वातावरण दुमदुमून गेले होते.

या दिव्य कार्यक्रमात स्थानिक महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करून भगवान शिव शंकराची पूजा केली आणि “हर हर महादेव”च्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले होते. मंदिरात महादेवाची मूर्ती उत्तम प्रकारे सजवण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी, प्रसाद आणि आरतीच्या वाटपाने वातावरण पूर्णपणे आध्यात्मिक उर्जेने भरले गेले.

भुल्लर महाराजांच्या या उपक्रमाने केवळ धार्मिक भावना व्यक्त केल्या नाहीत तर सामाजिक एकता आणि सांस्कृतिक जाणीव देखील बळकट केली.आम्ही नेहमीच महिलांच्या पाठीशी उभे राहतो  तसेच विविध परिसरामध्ये  असे भक्तीमय कार्यक्रम आयोजित केले जातील. सर्व महिलांनी त्यात सहभागी व्हावे असे  समाजसेविका सौ.परमिंदरकौर भुल्लर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘प्रतिस्पर्ध्याकडून मित्राकडे’: विराट कोहलीने केन विल्यमसनसाठी मनापासून निरोप दिला | क्रिकेट बातम्या

विराट कोहली आणि केन विल्यमसन (पीटीआय फोटो) न्यूझीलंडच्या महान फलंदाजाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने केन विल्यमसनला...

‘मार्ड सदस्य नाही’: कोण आहे सेजल पवार? ‘पुरुषांच्या मृतदेहाचे प्रायव्हेट पार्ट’ विनोदामुळे वादाच्या केंद्रस्थानी...

एमबीबीएसचा विद्यार्थी वादाच्या केंद्रस्थानी मुंबई: मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पिटलशी संबंधित एमबीबीएस पदवीधर सेजल पवार या विद्यार्थिनीने...

नोकरीचे आश्वासन देऊन तंत्रज्ञांची फसवणूक केल्याप्रकरणी प्लेसमेंट फर्मच्या मालकाला ताब्यात घेतले

प्राथमिक पोलिस तपासात किमान 20 उमेदवारांची या फर्मने फसवणूक केली असावी पुणे : पाच सॉफ्टवेअर अभियंत्यांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध...

आर प्रज्ञानंधा आणि वैशाली ‘गोल्डन चेस बहिण’ बनण्यापूर्वी; त्यांच्या आईने पाया बांधला: नागलक्ष्मीने दोन...

जेव्हा आर प्रग्नानंद नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय बनला, तेव्हा जगाने तरुण ग्रँडमास्टरच्या तेजाचा आनंद साजरा केला. निश्चितच, त्यांचा विजय भारतासाठी अभिमानास्पद होता,...

नोकरीच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नका: महा मेट्रो

पुणे : मेट्रो प्रशासनाने नोकरी इच्छूक आणि नागरिकांनी खोट्या भरतीच्या जाहिरातींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.प्रशासनाने म्हटले आहे की "बेईमान घटक" अनैतिक...

error: Content is protected !!