Homeताज्या बातम्याकल्याण मुरबाड रायते नवीन पुलावर मिक्सर आणि काळी पिवळी गाडीची समोरासमोर...

कल्याण मुरबाड रायते नवीन पुलावर मिक्सर आणि काळी पिवळी गाडीची समोरासमोर धडक : ११ जणांचा जागीच मृत्यू : गाडीचा चक्का चुरा

कल्याण दि.१३ ( प्रमोद दळवी ): कल्याण मुरबाड हायवे जवळील रायता नवीन पुलावर सोमवारी  सकाळी ११  च्या सुमारास भरधाव वेगाने कल्याणकडे जाणाऱ्या मिक्सर गाडीने कल्याणहून मुरबाड कडे जाणाऱ्या काळ्या पिवळ्या गाडीला जोराने धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती अक्षरशा काळ्या पिवळ्या गाडीचा चक्का चुरा झाला. त्या गाडीतील ११  प्रवाशांचा गंभीरित्या जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की अकराच्या ११  प्रवासी रक्तरंजित अवस्थेत रस्त्यावर पडले होते.

नुकताच आठ दिवसांपूर्वी रायते नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यात एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे सतत वाहनांची वर्दळ चालू असते . सोमवारी सकाळी ११  च्या सुमारास कल्याणहून मुरबाडकडे निघालेल्या काळा पिवळ्या या गाडीत जवळपास ११  प्रवासी कोंबून बसवण्यात आले होते. ही गाडी सुसाट मुरबाडच्या दिशेने जात असताना कल्याण मुरबाड हायवे जवळील रायते नवीन पुलावर मुरबाड वरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मिक्सर गाडीने या काळी पिवळी गाडीला जोराने धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती या धडकेत काळी पोळी गाडीचा पूर्णपणे चक्का चुरा झाला. या गाडीत बसलेल्या ११  प्रवाशांना साधी बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. ते जखमी अवस्थेत गाडीचे तुकडे झाल्यावर ते रस्त्यावर रक्तरंजित अवस्थेत पडलेले होते. या अपघाताची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एडके यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे पोलीस पथकासह घटनास्थळी गेले. रस्त्यावर रक्तरंजित अवस्थेत पडलेल्या  प्रवाशांना गोविंली रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पण या अपघातात गंभीरित जखमी झालेल्या त्या ११  प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यात बहुतेक प्रवासी हे मुरबाड परिसरातील असल्याचे बोलले जात आहे.  हि अपघाताची घटना घडतातच मिक्सर गाडीचा ड्रायव्हर हा त्या ठिकाणाहून पळून गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातात काळी पिवळी गाडीचा चक्का चुरा झाल्याने. गाडीचे पत्रही काही जणांच्या पोटात व मानेवर घुसलेचे दिसत होते. अपघातामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून त्या ठिकाणाची वाहतुकीची कोंडी झाली होती. रायता हा नवीन पूल नुकता सुरू झाल्याने व त्या ठिकाणी एकेरी प्रवास असल्याने त्या पुलावरून जाताना वाणांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या भीषण अपघाताची नोंद टिटवाळा पोलीस ठाण्यात करण्यात आले असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मयत झालेल्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. या काळा पिवळ्या गाड्यांमध्ये नेहमीच प्रवासी कोंबून भरले जातात. याशिवाय या गाडीवरील चालक नेहमी वेगाने गाड्या चालवत असतात. समोरासमोर झालेल्या या धडकेत नक्की कोणाची चुकी होती याचाही तपास पोलीस करणार आहेत. या भीषण अपघातात काळा पिवळ्या गाडीवरील चालक देखील मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.वेग आणि निष्काळजीपणा यामुळे ही दुर्घटना घडल्या असल्याचे बोलले जात आहे.

प्रवाशांनी भरलेली ही इको कार महामार्गावरून जात असताना या काळी पिवळी प्रवासी  इको व्हेन मध्ये एकूण १२  प्रवासी होते. समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरच्या गाडीने या इको व्हॅन ला धडक दिली.त्यात ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा आवाज इतका मोठा झाला की स्थानिक नागरिकांनी हा आवाज ऐकून त्या ठिकाणी मदतीसाठी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या या इको कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी  अत्यंत जड अंतकरणाने केलं

एका इसमाने सांगितले ग्रुप ग्रामपंचायतला आम्ही शुक्रवारी सुद्धा त्यांना एक निवेदन दिलं होतं की हे जे काम आहे ते अर्धवट असताना तुम्ही गाड्या वगैरे चालू करू नका परंतु त्यांनी ते ऐकलं नाही त्याच्यानंतर दिशादर्शक फलकपण लावायला सांगितले होते. ते सुद्धा त्यांनी लावलेले नाहीत आणि अतिशय मनमानी मध्ये त्यांचा हा कारभार चालू आहे. रायताच्या बस स्टॉप जवळ आम्ही आंदोलन केले होते कारण  काही  दिवसापूर्वी छोटे मोठे जवळ पास आठ अपघात त्या ठिकाणी झाले आहेत. आज जवळपास बारा निष्पाप लोकांचा बळी गेला. याशिवाय आरटीओला विनंती करण्यात आली होती व शासनाच्या लोकांना सुद्धा विनंती करण्यात आली होती मोठमोठे मिक्सर अनधिकृत पणे चालू आहेत व ओवर लोड  गाड्या या रस्त्यावरून चालू आहेत. कुठलीही नियम पाळले जात नाही. मोठमोठ्या वाहनांवर आरटीओचा कुठलाच नियंत्र नाही. असे नागरिकांनी सांगितले .यापुढे मिक्सर आणि डंपर यांच्यावर आरटीओ तर्फे कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुरबाड – कल्याण महामार्गावरील रायते पुलावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघातात ११  निष्पास प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात तीन महिलांसह ९ इस्मानचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये १). प्रशांत (बबलू) रुपेश चंदने (देवगाव, मुरबाड),२) गणपत जैनू मधे (देवराळवाडी, मुरबाड),३) भूषण घोरपडे (तहसीलदार कार्यालय मुरबाड – मुंबई),४) स्नेहा मोहपे (नारायणगाव, मुरबाड),५) जिजा गोविंदा केंबारी (टेंभरे, मुरबाड),६) मानसी मोहपे (नारायणगाव, मुरबाड),७)अनंता पवार (साखरे, मुरबाड),८) प्रथमेश मोहपे (नारायणगाव, मुरबाड),९) दीपक गवळी (कल्याण),१०) अज्ञात मृत व्यक्ती ,११) अज्ञात मृत व्यक्ती या ११ जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अद्याप दोन जणांची ओळख पटली नाही.  या प्रकारे टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात सिमेंट मिक्सर गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक एडके करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई उच्च न्यायालयातील वकिलाची चाकूने भोसकून हत्या, ट्रान्सजेंडरसह ३ जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोडवर मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली (प्रतिनिधी एआय इमेज) छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील...

रस्त्यावरील उभ्या बसला रिक्षाची धडक : काचा मानेत घुसल्याने उल्हासनगरातील रिक्षा चालकाचा मृत्यू

उल्हासनगर दि १७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर रेल्वे स्टेशन येथून ठाकुर्लीला प्रवासी भाडे सोडून येत असताना ठाकुरली परिसरात रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या...

TCS नाशिक प्रकरणः फरार महिला कर्मचाऱ्याचा शोध सुरू; नाशिकचे पोलिस मुंबईत पोहोचले, पतीची चौकशी

मुंबई : नाशिकमध्ये दाखल झालेल्या टीसीएस छळवणूक आणि कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी फरार महिला कर्मचाऱ्याच्या शोधात नाशिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी मुंब्रा...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

‘हे एक गाव घेते’: एरिन राउटलिफ एकटेपणा, निष्ठा आणि दुहेरी खेळाडू म्हणून जीवनावर

एरिन राउटलिफ (एल) आणि गॅब्रिएला डॅब्रोव्स्की (आर) यांनी 2024 मध्ये यूएस ओपन महिला दुहेरीचे दोन विजेतेपद आणि वर्षअखेरीस डब्ल्यूटीए फायनल्स जिंकले. (एएफपी) नवी...

error: Content is protected !!