Homeताज्या बातम्याआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी उल्हासनगरात लसीकरण मोहीमचा शुभारंभ

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी उल्हासनगरात लसीकरण मोहीमचा शुभारंभ

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी ) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या निर्देशानुसार महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी HPV (Human Papillomavirus) लसीकरण मोहीम – गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंध ही मोहीम उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत रविवारी शुभारंभ करण्यात आली

या मोहिमेचे उ‌द्घाटन दि ८ मार्च २०२६ रोजी रविवारी सकाळी ११.०० वाजता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. २. नेहरू चौक, उल्हासनगर-२ येथे मा. महापौर श्रीमती अश्विनीताई निकम यांच्या शुभ हस्ते व मा. आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा. प्र. से.), मा. उपमहापौर अमर लुंड, यांच्या प्रमुख उपस्तिथीत पार पडले. तसेच महानगरपालिकेचे मा. उपायुक्त (वै.आ.वि) अनंत जवादवार, डॉ. मोहिनी धर्मा वैद्यकीय आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी उपस्थितांना HPV लस, गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंध व लसीकरण मोहिमेचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच मा. महापौर, मा. उपमहापौर व मा. आयुक्त मॅडम यांनी देखील नागरिकांना HPV लसीकरणाचे महत्त्व सांगून या मोहिमेला व्यापक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले व HPV लसीकरण मोहिमेच्या प्रसार व जनजागृतीसाठी (advocacy) मार्गदर्शन केले.

या मोहिमेअंतर्गत १४-१५ वर्षे वयोगटातील मुलींना HPV लसीकरण करण्यात येणार असून ही मोहीम दि. ८ मार्च २०२६ पासून पुढील ९० दिवसांपर्यंत राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हे लसीकरण त्यांच्या जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (न.प्रा.आ. केंद्र) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आज उद्घाटनाच्या दिवशी एकूण ११ मुलींना HPV लस देण्यात आली असून कोणतीही ALFI (Adverse Event Following Inamunization) नोंदवली गेलेली नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. HPV लस ही गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते या लसीकरणामुळे भविष्यातील कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. अधिक माहितीसाठी नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी अथवा आशा (ASIA) सेविकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिप रीडरचा दावा आहे की वर्ल्ड कप फायनलनंतर ट्रम्प यांनी स्पेन आणि अर्जेंटिनाच्या प्रत्येक...

रविवारी, 19 जुलै 2026 रोजी न्यूयॉर्कजवळील ईस्ट रदरफोर्ड, एनजे येथे स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्वचषक अंतिम फुटबॉल सामन्याच्या शेवटी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प...

मुंबईतील तिघांची मलंगगडावरून सुटका झाली आणि ट्रेकचा प्रयत्न केल्यावर त्यांनी रिल्सवर पाहिले

कल्याण : मुंबईतील मालाड येथील तीन तरुण रविवारी रात्री उशिरा अंबरनाथमधील मलंगगडाच्या उतारावर सोशल मीडियाच्या रील्सवरून प्रेरित होऊन ट्रेक करताना अडकल्याने त्यांची...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

अमेरिकेत ‘N’ ने सुरू होणारी फक्त 8 राज्ये आहेत आणि प्रत्येक एक अद्वितीय प्रवास...

FIFA विश्वचषक 2026 नंतर युनायटेड स्टेट्समध्ये रोड ट्रिपची योजना आखणाऱ्यांसाठी, आम्हाला तुमच्यासाठी एक मनोरंजक यादी मिळाली आहे. "N" अक्षराने सुरू होणारी फक्त...

उल्हासनगरातील जिजामाता कॉलनीतील कल्व्हर्टच्या निकृष्ट कामावर नागरिकांचा संताप; तातडीने अभियंत्यांकडून पाहणी करून योग्य पद्धतीने...

उल्हासनगर दि . २० ( प्रमोद दळवी ) : जिजामाता कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कल्व्हर्ट (Culvert) बांधकामावर परिसरातील नागरिकांनी गंभीर आक्षेप घेत निकृष्ट दर्जाचे...

error: Content is protected !!