उल्हासनगर दि. १२( प्रमोद दळवी ) : शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) व शिवसेना सेंचुरी कॉलनी शाखेच्या वतीने पॅनल क्रमांक १ मध्ये श्रावणमास प्रारंभ निमित्त श्रावण विशेष शिव चर्चा व भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात भक्ती भावनेने संपन्न झाला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

श्रावण महिन्याच्या सुरुवाती निमित्त उल्हासनगरातील पॅनल क्रमांक १ मधील सीडीएस कॉलनी मध्ये भक्तिमय शिव चर्चा आणि भजन संध्या कार्यक्रमात स्थानिक महिलांनी सहभागी होऊन श्रद्धा आणि भक्तीने शिव शंकराची पूजा केली. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेविका सौ.परमिंदरकौर भुल्लर,शिवसेना उपशहर संगठक सौ.पूनम यादव,सौ.सोनी खैरे,विभाग संगठक सौ.सविता कुंभार,उपविभाग संगठक सौ.गीता शुक्ला समाजसेविका सौ.कामिनी सिंह,सौ.पुष्पा मिस्त्री,सौ.गीता सिंह यांच्या सहभागाने कार्यक्रम अधिकच भव्य झाला. संपूर्ण कार्यक्रमात हर हर महादेवाच्या नावाने भजनाच्या मधुर आवाजाने आणि भगवान शिव शंकराच्या महिम्याच्या अनुभूतीने वातावरण दुमदुमून गेले होते.

या दिव्य कार्यक्रमात स्थानिक महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करून भगवान शिव शंकराची पूजा केली आणि “हर हर महादेव”च्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले होते. मंदिरात महादेवाची मूर्ती उत्तम प्रकारे सजवण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी, प्रसाद आणि आरतीच्या वाटपाने वातावरण पूर्णपणे आध्यात्मिक उर्जेने भरले गेले.

भुल्लर महाराजांच्या या उपक्रमाने केवळ धार्मिक भावना व्यक्त केल्या नाहीत तर सामाजिक एकता आणि सांस्कृतिक जाणीव देखील बळकट केली.आम्ही नेहमीच महिलांच्या पाठीशी उभे राहतो तसेच विविध परिसरामध्ये असे भक्तीमय कार्यक्रम आयोजित केले जातील. सर्व महिलांनी त्यात सहभागी व्हावे असे समाजसेविका सौ.परमिंदरकौर भुल्लर यांनी सांगितले.





























