Homeताज्या बातम्याराज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र...

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १५ : राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये सहभागी व्हावेत आणि शिस्तप्रिय,आत्मविश्वास असलेला, सांघिकवृत्ती जोपासणारा, नेतृत्वाभिमुख विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीकोनातून सैनिकी शाळांचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी शाळांकडून होत असून या मागण्यांच्या अनुषंगाने आणि शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, माजी मंत्री राजेश टोपे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या समितीने सैनिकी शाळातील शैक्षणिक सुधारणा, गुणवत्ता, प्रवेशप्रक्रिया, सीबीएसई अभ्यासक्रम आणि शाळेच्या विविध मागण्यासंदर्भात अभ्यास करून एक महिन्यात राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी हिताचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, सैनिकी शाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असून या समितीने शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून शाळेच्या मागण्या, अडचणी काय आहेत याचा सविस्तर अभ्यास करून कालमर्यादेत अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबरनाथमध्ये १२ व्या मजल्यावरून मांजरीला ढकलून जीव ठार मारले : इसमाविरुद्ध गुन्हा

अंबरनाथ दि. २९ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ येथील रॉयल फ्लोरा फेस या निवासी संकुलात एका धक्कादायक घटनेने प्राणीप्रेमींसह नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

उल्हासनगर-अंबरनाथदरम्यान रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स; मोटरमन-गार्डच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला

उल्हासनगर दि.२९ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर - अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळावर मंगळवारी सायंकाळी एक जड लोखंडी चौकोनी बॉक्स...

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमनच्या कार्यालयावर आणि दोन फ्लॅटवर हातोडा

मुंबई: मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या तेहतीस वर्षांनंतर, टायगर मेमन याच्या 1992-93 च्या जातीय दंगलीत जाळण्यात आलेल्या त्याच्या माहीम कार्यालयासह त्याच्या तीन मालमत्तांचा मंगळवारी...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

error: Content is protected !!