Homeताज्या बातम्यापालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

अवकाळीमुळे नुकसान; कृषी दर्जा निकषानुसार मदत

मुंबई, दि. १५ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आलेला आहे. त्या निकषानुसार नुकसानग्रस्त मत्स्य व्यवसायिकांना तात्काळ मदत देण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

पालघर व ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मत्स्य व्यवसाय संबंधित झालेल्या नुकसानीबाबत मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, मदत व पुनर्वसन विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड, अवर सचिव सुनिल सावंत, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, उपसचिव किशोर जकाते व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले, ६ मे २०२५ रोजी झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील मच्छीमारांच्या सुमारे ९६ बोटींचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील अर्नाळा येथील अनेक मच्छीमारांचे सुकवण्यासाठी घातलेल्या मासळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकताच मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आलेला असून त्यानुसार मदत करण्यात येईल, असेही मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले की, नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे योग्य ती नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. तसेच शासन निर्णयात काही बाबींसाठी तरतूद, वाढीव मागणीबाबत मदत व पुनर्वसन विभागाने प्रस्ताव तयार करावा, असे मंत्री राणे यांनी सांगितले.मत्स्य व्यवसायाच्या अवकाळी नुकसानीबाबत वाढीव मागणीचा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येईल, असे मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

वैभव सूर्यवंशीचा 10 वर्षांचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने झळकावले शतक

वैभव सूर्यवंशी आणि आशीर्वाद सूर्यवंशी नवी दिल्ली : सूर्यवंशी कुटुंबात क्रिकेट खेळताना दिसत आहे. किशोरवयीन सनसनाटी वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय मंचावर सतत चर्चेत असतो,...

संघर्षाच्या रणांगणातून राष्ट्रवादी कधीही मागे हटणार नाही, असे सुनेत्रा म्हणाल्या

मुंबई : कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची एकजूट, अविचल निष्ठा आणि कठोर परिश्रम यातून पक्षाचे भवितव्य उज्वल होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा...

‘वारंवार माझा अपमान केला’ : पुण्यातील टीसीएसच्या तांत्रिकाने गळफास घेतला; २ सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर

पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

एम्पायर स्टेट बिल्डिंगने अमेरिकेच्या मैलाचा दगड वर्षातील प्रत्येक प्रवाशाच्या न्यूयॉर्क प्रवासाचा अव्वल का असावा...

एम्पायर स्टेट बिल्डिंग, न्यूयॉर्क शहराच्या क्षितिजावर उंच, जगातील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या आर्किटेक्चरल लँडमार्क्सपैकी एक आहे आणि ट्रिपॅडव्हायझरच्या 2026 ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड्समध्ये यूएस...

error: Content is protected !!