Homeताज्या बातम्याधर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा - खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे...

धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे आंतरराष्ट्रीय मंचावरून आवाहन

  • दशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता; पाकिस्तानला थेट इशारा
  • सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा सिएरा लिओनचा दौरा यशस्वी

फ्रिटाऊन, सिएरा लिओन :-

पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा. असा इशारा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला. तर याच पार्श्वभूमीवर आता भारताने ‘ दशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता ” धोरण अवलंबिले आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सिएरा लिओन या देशाला २८ ते ३० मे २०२५ दरम्यान भेट दिली. या भेटीमागील उद्दिष्ट जागतिक स्तरावर दहशतवादाच्या गंभीर धोक्याविषयी जनजागृती करणे व आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवणे हे होते. या शिष्टमंडळाने सिएरा लिओनमधील विविध उच्चपदस्थ व्यक्तींशी विस्तृत चर्चा केली. यात संसदाध्यक्ष, संसद सदस्य व परराष्ट्र विषय समिती, संरक्षण उपमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक, कार्यवाह परराष्ट्र मंत्री तसेच सिएरा लिओनचे उपराष्ट्रपती यांचा समावेश होता. भारताचा दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता  धोरण या बैठकांमध्ये अधोरेखित करण्यात आले आणि दहशतवादविरोधी जागतिक ऐक्याची आवश्यकता ठळकपणे मांडण्यात आली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सिएरा लिओनच्या संसदेने तीव्र शब्दांत निषेध केला आणि हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी मौन पाळून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.

सिएरा लिओनचे उपराष्ट्रपती डॉ. मोहम्मद जुलडेह जल्लोह, यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारतातील दहशतवादी हल्ल्यातील मृत्युमुखी नागरिकांप्रती शोक व्यक्त केला आणि भारतासोबत ऐक्य दर्शवले. संरक्षण उपमंत्री कर्नल (निवृत्त) मुआना ब्रिमा मासाकोयी आणि विरोधी पक्षाचे उपनेते डॅनियल ब्रिमा कोरोमा यांनीही दहशतवादाचा तीव्र निषेध करत भारताच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शवला. मंत्री मासाकोयी यांनी अफ्रिकन देशांनीही त्वरित एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढण्याची गरज असल्याचे नमूद केले.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओनमधील विविध परदेशी राजनयिक अधिकाऱ्यांशी संवाद साधत दहशतवादविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कारवाईची गरज अधोरेखित केली. भारताविरुद्ध सीमापार दहशतवादी कारवाया घडवणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या व प्रायोजित करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.

या शिष्टमंडळाने सिएरा लिओनमधील स्थानिक प्रसारमाध्यमे व भारतीय समुदायाशी संवाद साधला आणि भारत व सिएरा लिओनमधील दृढ मैत्रीचे पुन्हा एकदा स्मरण करून दिले. या भेटीचा समारोप संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि इतर जागतिक मंचांवर दहशतवादाविरोधात समन्वित कारवाई करण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय शांततेच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनासह झाला.

या दौऱ्यादरम्यान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथील संसद अध्यक्ष यांच्यासमवेत इतर संसदीय सदस्यांसह झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत भारत आणि दहशतवाद याबाबत विविध महत्वाच्या विषयांना अगदी आक्रमक पद्धतीने हात घालून थेट पाकिस्तानवर सडकून टीका देखील केली. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा माणुसकीवर झालेला हल्ला असून पाकिस्तान या दहशवादाला खतपाणी घालत असल्याचे टीका देखील त्यांनी यावेळी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तान संघ भारतात पाठवत नाही

भारत आणि पाकिस्तानचे ध्वज (पीटीआय फोटो) आयोजकांकडून अधिकृत निमंत्रण मिळूनही पाकिस्तान या महिन्याच्या अखेरीस नवी दिल्ली येथे होणाऱ्या आशियाई वरिष्ठ तलवारबाजी चॅम्पियनशिपसाठी आपला...

मुंबई टरबूज मृत्यू: नवीन फॉरेन्सिक चाचणी अहवालात भांडी, पुलाव आणि हर्बल उंदीर तिरस्करणीय झिंक...

मुंबई: डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे, नवीन फॉरेन्सिक चाचणी अहवालात त्यांच्या पायधोनी घरातून गोळा केलेल्या चाकू, ताट, तांदूळ,...

पीएमसी संचलित वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाच्या तक्रारींबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत

पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (बीएव्हीएमसी) पुणे : पीएमसी संचालित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बीएव्हीएमसी) च्या किमान चार महिला...

दिवसाची ग्रीक म्हण: “पुरुष महत्त्वाकांक्षेने सूर्यासारखा उगवू शकतो, पण स्त्री…” |

दिवसाची ग्रीक म्हण (प्रतिमा: AI-व्युत्पन्न) प्रत्येक कुटुंबात एक आहे.सर्वात मोठा आवाज करणारी व्यक्ती नाही. सर्वात महत्वाकांक्षी नाही. सर्वात यशस्वी देखील नाही, कमीतकमी ज्या...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन पुणे बातम्या

पुणे : माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य अनंतराव थोपटे यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे...

error: Content is protected !!