Homeशहरउल्हासनगरात सर्व महानगरपालिका शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उपक्रम : शाळेच्या पहिल्या दिवशी...

उल्हासनगरात सर्व महानगरपालिका शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उपक्रम : शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत व मार्गदर्शन

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व महानगरपालिका शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सोमवारी दि.१५ जुन, २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. शासन निर्देशानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी दि.१५ जुन, २०२६ रोजी लोक प्रतिनिधी, उल्हासनगर महानगरपालिकेचे वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी महानगरपालिकांच्या शाळांना भेटी देऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत व मार्गदर्शन करण्यात आले.

त्यास अंबरनाथ विधानसभा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महानगरपालिकेचा शहीद भगत सिंग हिंदी विद्यालय (मनपा शाळा क्र. ५) उल्हासनगर ५ येथे भेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तके व स्वतः मार्फत विद्यार्थ्यांना वह्या व छत्रींचे वाटप करण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिकेचे महापौर अश्विनी निकम , उप महापौर अमर लुंड, स्थायी समिती सभापती कलवंतसिंह सोहता, गटनेता अरुण आशान ,सभापती, शिक्षण समिती, व सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक यांनी त्यांच्या प्रभागातील महानगरपालिकेच्या शाळांना तसेच उल्हासनगर महानगरपालिकेतील वर्ग १ व २ चे अधिकारी यांनी सुद्धा भेटी देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत व मार्गदर्शन केले. भेटी दरम्यान नवगतांचे स्वागत पुष्पवृष्टि तसेच पुष्प देऊन करण्यात आले. सबंधित मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण व मार्गदर्शन केले. जसे मनपा शाळा क्र. १८ च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक व फॅन्सी ड्रेस परिधान करून महापौर अश्विनी कमलेश निकम यांचे स्वागत केले.

मनपा शाळा क्र. १७ व २७ मध्ये इ. १ ली च्या विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे व मनपा शाळा क्र. ८,२९ व ३० यांनी विद्यार्थ्यांच्या तळ पायाचे ठसे एक आठवण म्हणून घेण्यात आले. तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी लाडू व चॉकलेटचे वाटप करून विद्यार्थ्यांचा आजचा पहिला दिवस गोड करण्यात आला.

महानगरपालिकेच्या ८ शाळांमधील ४० वर्ग खोल्या ह्या डिजिटल करण्यात आलेल्या असून महापौर अश्विनी निकम यांनी हिंदी माध्यमांच्या शाळा डिजिटल करण्याकरीता पावले उचलली आहे. तसेच मा. शिक्षण सभापती यांनी उल्हासनगर महानगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा लवकरच सुरू करणार असल्याचे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप लवकरच करणार आहे असे जाहिर केले. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत गुण संपादन करीत आहेत. त्यामुळे समाजातील सर्व पालकांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

150 किमी प्रतितास आणि वाढत: अशोक शर्माला इंडिया ए कॉल-अप मिळाला

अशोक शर्मा (बीसीसीआय/आयपीएल फोटो) जयपूरमधील TimesofIndia.com: राजस्थानमधून गुजरातमध्ये देशांतर्गत निष्ठा बदलल्यानंतर एका दिवसानंतर, वेगवान गोलंदाज अशोक शर्माला दुखापतीचा बदला म्हणून श्रीलंकेतील भारत अ...

धोक्यांचा सामना करणाऱ्या निवृत्त न्यायाधीशांसाठी चोवीस तास सुरक्षा कवच असल्याची खात्री करा: हायकोर्टाने राज्य...

स्वाती देशपांडेमुंबई : दाऊदी बोहरा समुदायाच्या अध्यात्मिक प्रमुखाच्या उत्तराधिकाराच्या लढाईत एप्रिल 2024 च्या निकालानंतर न्यायमूर्ती (निवृत्त) गौतम पटेल यांना गेल्या सप्टेंबरपासून समोर...

ऑनलाइन लग्नाच्या आमंत्रण लिंकसाठी पुण्यातील दुकानदाराला ५.३ लाख रुपये मोजावे लागतात

हुड असलेला हॅकर लॅपटॉपवर ग्लोइंग कोड आणि डिजिटल सिक्युरिटी ॲलर्टमध्ये काम करतो, सायबर गुन्हे, डेटा भंग आणि ऑनलाइन फसवणूक यांचा वाढता धोका दर्शवतो....

प्रभावी पालकत्व: एका महिलेने आपल्या मुलाला सर्वांसमोर “मूर्ख” म्हटले: या आईने पुढे काय केले...

एका महिलेने आपल्या मुलाला सर्वांसमोर “मूर्ख” म्हटले: या आईने पुढे काय केले ते पालकत्वाचा एक शक्तिशाली धडा आहे (AI-व्युत्पन्न प्रतिमा) कोणीतरी त्यांच्या मुलाकडे...

युगांडाच्या चिंपांझीच्या ‘सिव्हिल वॉर’ने शास्त्रज्ञांना धक्का का दिला आहे

मॉर्टन (डावीकडे) आणि गॅरिसन जेव्हा न्गोगो गृहयुद्ध सुरू झाले तेव्हा अविभाज्य होते. गॅरिसनच्या गटाने नंतर मॉर्टनला ठार मारले पुणे : युगांडाच्या राष्ट्रीय उद्यानात...

error: Content is protected !!