Homeशहरगल्लीमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटवण्यासाठी मानपाडा पोलिसांचे आवाहन

गल्लीमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटवण्यासाठी मानपाडा पोलिसांचे आवाहन

डोंबिवली  दि. ३ ( प्रमोद दळवी )  : डोंबिवली पूर्व येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा परिसरात एका गल्लीमध्ये सुमारे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताची अद्याप ओळख पटलेली नसून त्याची ओळख निश्चित करण्यासाठी मानपाडा पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनारपाडा येथील ‘मोर्या’ नावाच्या पानटपरीच्या मागील बाजूस असलेल्या गल्लीमध्ये एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेला असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्याच्या तोंडावर व डोळ्यांवर माशा बसलेल्या होत्या आणि तो कोणतीही हालचाल करत नसल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी तातडीने मानपाडा पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित इसमाला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

प्राथमिक तपासात संबंधित इसमाचा मृत्यू एखाद्या आजारामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत इसमाचे वय अंदाजे ४० वर्षे असून, उंची सुमारे ५ फूट २ इंच, बांधा मध्यम, रंग सावळा आणि दाढी वाढलेली आहे. त्याने गुलाबी रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि चॉकलेटी रंगाची मळलेली फुल पॅन्ट परिधान केली होती. या अनोळखी मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याच्याबाबत कोणाला कोणतीही माहिती असल्यास त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अंमलदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर यांनी केले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे मृताची ओळख पटविण्यास आणि त्याच्या नातेवाईकांपर्यंत माहिती पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह...

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं - १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील पॅनल...

उल्हासनगरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर शहरात सभासद नोंदणी अभियानाला सोमवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली....

उल्हासनगरात शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीन दिवसीय मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा...

उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी )  : शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाप्रमुख गोपाळ...

स्वराज्य संघटनेच्या तक्रारीनंतर मशीनद्वारे मॅनहोल साफसफाई; अधिकारी व ठेकेदारांनी कामगाराlला जाणीवपूर्वक मॅनहोलमध्ये उतरविल्याचा...

उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या समता नगर, उल्हासनगर-४ येथील मॅनहोलमध्ये २९ जुलै २०२६ रोजी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष मॅनहोलमध्ये...

error: Content is protected !!