Homeताज्या बातम्याशासनाच्या निर्देशान्वये उल्हासनगर महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आली आणीबाणी विषयाची चित्रफीत

शासनाच्या निर्देशान्वये उल्हासनगर महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आली आणीबाणी विषयाची चित्रफीत

  • चित्रफित जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचे सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांचे आवाहन

उल्हासनगर दि २५ : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीला बुधवारी आज २५ जून २०२५ रोजी ५० वर्षे पूर्ण झाले आहे. या महत्त्वपूर्ण घटनेच्या स्मरणार्थ, राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विशेष प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशान्वये उल्हासनगर महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आणीबाणी विषयाची चित्रफीत दाखवण्यात आली.

केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे, आणीबाणी प्रदर्शन व इतर कृतीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासंदर्भात दिनांक २०/०६/२०२५ रोजी शासन स्तरावरून महापालिका प्रशासनास निर्देश दिले आहेत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी निवड केलेल्या महानगरपालिका व नगरपालिका यांच्या कार्यालयामध्ये सदरची कार्यवाही ही दिनांक २५/०६/२०२५ पासून करावयाची आहे.त्यानुसार मा. महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे भा.प्र.से.. यांच्या मार्गदर्शनाखाली व उप-आयुक्त श्रीम. स्नेहा करपे, सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी श्री. अजय साबळे यांचे उपस्थितीत शासन निर्देशान्वये सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणी विषयीची शासनाने तयार केलेली चित्रफीत आज दिनांक २५/०६/२०२५ रोजी सायं. ४:०० वाजता महापालिका मुख्यालयातील सभागृहात सर्व महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना दाखविण्यात आली.

 सदर चित्रफीतीमध्ये भारतामध्ये दि. २५ जून, १९७५ ते दि.३१ मार्च, १९७७ या कालावधीत घोषीत करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या स्वयंसेवी, सत्याग्रहींनी लोकशाहीकरिता लढा देऊन बंदिवास सोसला, अशा सत्याग्रहोंनी त्यावेळची परिस्थितीबाबत आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास उप-आयुक्त श्रीम. स्नेहा करपे, सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी श्री. अजय साबळे, सहा. आयुक्त श्रीम. सलोनी निमकर, दिव्यांग कल्याण योजना विभाग प्रमुख श्री. राजेश घनघाव, पर्यावरण विभाग प्रमुख श्री. दत्तात्रेय जाधव, वाहन विभाग प्रमुख श्री. विनोद केणे, क्रीडा विभाग प्रमुख श्री. शांताराम चोधरी, सुरक्षा अधिकारी श्री. यशवंत सगळे, कनिष्ठ अभियंता श्री. महेंद्र धिंडे, सिस्टीम अॅनलिस्ट श्रीम. श्रध्दा बाविस्कर व इतर महापालिका अधिकारी/कर्मचारी उपस्थीत होते.श्री. अजय साबळे, सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी यांनी उपस्थितांना सदरची चित्रफीत शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पाठविणेचे आवाहन करून सदर कार्यक्रमाची सांगता केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

विमानतळाजवळील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी PMC वरिष्ठ अधिकारी IAF सोबत समन्वय साधतील

पुणे विमानतळ परिसरात एक भटका कुत्रा फिरत आहे पुणे : केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, मुख्य नागरी समस्यांवर, विशेषत:...

error: Content is protected !!