उल्हासनगर दि २५ : उल्हासनगर शहरातील गुलशननगर परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. त्या ठिकाणी सी.सी रस्ता बनवण्यात यावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. आमदार कुमार आयलानी यांच्या प्रयत्नाने नागरिकांची ही मागणी पूर्ण झाली असून नुकताच त्या रस्त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते त्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

हा रस्ता ए.पी.जे अब्दुल कलाम स्कूल गुलशननगर येथून कब्रिस्तान पर्यंत हा रस्ता सी.सी बनवण्यात येणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कुमार आयलानी,कल्याण युवासेना लोकसभा सचिव श्री हरजिंदरसिंह भुल्लर,माजी नगरसेविका सौ.अर्चना करणकाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी समाजसेवक साबिर शेख, अब्दुल गफ्फार,साबीर खान व परिसरातील नागरिक उपस्थित होते.






























