- शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने महावितरण कार्यकारी अभियंतास निवेदन
उल्हासनगर दि.१४ : उल्हासनगर-४ विभागात गेल्या अनेक दिवसांपासून रोजच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने विभागातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर देखील होतो.वारंवार लेखी पत्राद्वारे तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नाही.म्हणून शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली लेखी तक्रार पत्र महावितरणाला देण्यात आले .
शिवसेना उपशहर संघटक विजय सावंत,विभाग प्रमुख बापू सावंत,उपविभाग प्रमुख प्रा.प्रकाश माळी सर व अनिल लोंढे,शाखा प्रमुख निखिल पाटील यांनी कार्यालय प्रमुख पांडुरंग कावरे तसेच संकेत महाजन यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने असिस्टंट इंजिनिअर नेहा ढोके व ज्युनिअर इंजिनिअर समता जोशी यांच्याकडे लेखी तक्रार पत्र सुपूर्द केले.जर महावितरणच्या कामात सुधारणा झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.





























