Homeशहरभरत नगर येथील रेल्वे ट्रॅक जवळील तो मातीचा भराव काढल्याने नाल्यातील पाण्याचा...

भरत नगर येथील रेल्वे ट्रॅक जवळील तो मातीचा भराव काढल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू : काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका अंजली साळवे यांच्या प्रयत्नांना यश

  • अंबरनाथ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांनी त्वरित दखल घेतल्याने त्यांचे मानले आभार

अंबरनाथ दि..१३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरतील भरत नगर येथे रेल्वे ट्रॅक जवळ असलेल्या नाल्यात टाकण्यात आलेल्या मातीचा भराव अखेर हटवण्यात आल्याने त्या नाल्याचा प्रवाह आता सुरळीत सुरू झाला आहे. काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका अंजली साळवे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे बंद असलेल्या नाल्याचा प्रवाह आता सुरळीत सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार प्रकट केले आहे.

उल्हासनगर शहरातील भरत नगर येथे रेल्वे ट्रॅक जवळील वाहणाऱ्या नाल्यात रेल्वेने मातेचा भराव टाकल्यामुळे त्या ठिकाणावरील नाल्याचा प्रवाह बंद झाला होता. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या  व नगरसेविका अंजली साळवे यांनी महानगरपालिकेच्या मुख्य स्वच्छता निरक्षकांसह भरत नगर येथील त्या नाल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तो नाल्याचा प्रवाह मातीच्या भरावामुळे बंद असल्याचे त्यांच्या निर्देशनात आले होते.  या बंध नाल्याच्या  प्रवाहामुळे पावसाळ्यात भरत नगर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांनी त्वरित या समस्या बाबत अंबरनाथ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांना सांगितले. नगरसेविका अंजली साळवे यांच्या समस्या गांभीर्याने घेत नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांनी त्वरित आदेश दिलाने भरत नगर येथील रेल्वे ट्रॅक जवळील नाल्यात टाकण्यात आलेला मातीचा भराव हटवण्यात आला आहे. त्यामुळे भरत नगर येथील नाल्याचा प्रवाह आता सुरळीत सुरू झाला आहे. नाल्याचा प्रवाह बंद असल्यामुळे त्या ठिकाणी नाल्यामध्ये घाण तुंबून राहिली होती. पण आता नाल्याचा प्रवाह सुरू झाल्याने तो तुंबलेला घाण कचरा नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. त्यामुळे भरत नगर येथील नाला आता स्वच्छ दिसू लागला आहे. पावसाळ्यात आता त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार नाही असे चित्र दिसू लागले आहे.

नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांनी आपल्या समस्यांची त्वरित दखल घेतल्याने काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका अंजली साळवे यांनी नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांचे आभार प्रकट केले आहे. नगरसेविका अंजली साळवे यांच्या प्रयत्नामुळे भरत नगर येथील नाल्याचा प्रवाह आता सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी देखील अंजली साळवे यांचे आभार मानले आहे. भरत नगर परिसरात पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये व नागरिकांच्या घराचेही नुकसान होऊ नये याकरिता मी या गंभीर समस्या बाबत नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांना संपर्क साधून सांगितल्यामुळे आज भरत नगर येथील बंद असलेल्या नाल्याचा प्रवाह सुरळीतपणे सुरू झाले असल्याचे अंजली साळवे यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित...

उल्हासनगरातील सात मजली ‘आशालोक’ इमारतीला भीषण आग : ४९ फ्लॅटधारकांची सुखरूप सुटका, आठ दुचाकी...

उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प - ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह...

मुसळधार पावसाने अंबरनाथमध्ये घर नाल्यात कोसळले : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची तातडीने धाव,...

अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्व येथील कोकण नगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली....

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह...

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं - १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील पॅनल...

error: Content is protected !!