उल्हासनगर दि.१३ : रविवारी उल्हासनगरात वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पुर्व तर्फे पॅनल क्रमांक १३ ,१८ तसेच १९ मध्ये विविध विभागात वृक्षरोपण करण्यात आले. महाराणा प्रताप चौक येथून सुरुवात केली.त्यानंतर राजपुत गल्ली,डिफेन्स कॉलनी,समता नगर तसेच तानाजी नगर या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी स्थानिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.प्रत्येक विभागातील स्थानिकांना झाडाचे पालकत्व स्विकारले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात,मान.शेषराव वाघमारे,शहर संघटक देवानंद शिरसाट,जेष्ठ कार्यकर्ते दिवाकर खळे,वॉर्ड अध्यक्ष सुरेंद्र गायकवाड,वॉर्ड अध्यक्ष युवराज भगत,वॉर्ड अध्यक्ष भारत थोरात,वॉर्ड अध्यक्ष दिपक आढाव मान्यवर उपस्थित होते.

सदर उपक्रमात हिरा यांनी अतिशय मोलाची मदत केली. वृक्षमित्र बी.आर.पाटील तसेच पी.के.कांबळे यांनी झाडे उपलब्ध करून दिली. सदर वृक्षारोपण कार्यक्रम उपाध्यक्ष महेंद्र अहिरे (माही) यांच्या पुढाकाराने साकार झाला.यावेळी पत्रकार आबासाहेब वाघमारे,आबा साठे तसेच मच्छिंद्र मोरे उपस्थित होते.





























