Homeशहरमहावितरणाच्या वाढत्या समस्या संदर्भात मुख्य अभियंता सोबत बैठक संपन्न

महावितरणाच्या वाढत्या समस्या संदर्भात मुख्य अभियंता सोबत बैठक संपन्न

  • महावितरणांसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा
  • समस्येचे निवारण करण्याचे  आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची मागणी वजा आदेश

उल्हासनगर दि.१४ : अंबरनाथ व उल्हासनगर मधील महावितरणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या पुढाकाराने महावितरणचे मुख्य अभियंता श्री.चिंतामणी मिश्रा साहेब यांच्या समवेत कल्याण ‘तेजश्री’ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महावितरणांसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

महावितरणाच्या वाढत्या समस्या काय आहेत याबाबत सविस्तर माहिती मुख्य अभियंता यांना सांगण्यात आली त्यात १) शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नादुरुस्त असलेले ट्रान्सफार्मर, विद्युत पोल, विद्युत वाहिनी तातडीने बदलण्यात याव्यात. २) विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी.३) बऱ्याच ठिकाणी पोलवरील विद्युत वाहिनी लटकत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्याची दुरुस्ती करण्यात यावी.४) नागरीकांच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संबधित अधिकाऱ्यांवर जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ५) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना आवश्यक सहकार्य करून विजेच्या अभावी पाणी पुरवठा खंडीत होता कामा नाही असे सक्त ताकीद दिली.६) योजने आंतर्गत ग्राहकांना फायदा मिळून देणे.७) रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करत असलेले विनावापर व नादुरुस्त असलेले विद्युत पोल तातडीने हटविण्यात यावेत.८) उल्हासनगर -५ येथे वारंवार विजपूरवठा खंडित होत असल्याने येथिल लघु उद्योग व छोटे कारखानदार यांना होणारा त्रास व रोजंदारी वर काम करणाऱ्या वर्गाला भेडसवनारी समस्येचे निवारण करावे अशी मागणी वजा आदेश आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थिती अधिकारी यांना दिले. त्यावेळी शिवसेनेचे उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शिक्षादानाचा अनोखा उपक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्विमिंग पूल, विराट...

RRR पुन्हा एकत्र; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य, संघटनेच्या एकजुटीला नवी बळकटी

उल्हासनगर दि. ७ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या शिवसेनेच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी एक भावनिक आणि प्रेरणादायी घटना नुकतीच घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंह...

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित...

उल्हासनगरातील सात मजली ‘आशालोक’ इमारतीला भीषण आग : ४९ फ्लॅटधारकांची सुखरूप सुटका, आठ दुचाकी...

उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प - ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह...

मुसळधार पावसाने अंबरनाथमध्ये घर नाल्यात कोसळले : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची तातडीने धाव,...

अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्व येथील कोकण नगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली....

error: Content is protected !!