उल्हासनगर दि.२० : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिली पासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. स्वराज्य संघटना सरकारचा या भूमिकेचा निषेध करीत असल्याचे ॲड जय गायकवाड यांनी सांगतले .
ॲड जय गायकवाड म्हणाले मुळात महाराष्ट्राच्या राज्य कारभाराची भाषा ही मराठी आहे. त्यामुळे भाषेची सक्ती करणे चुकीचे आहे. या आंदोलनात आम्ही राज ठाकरे यांचा भूमिकेशी सहमत असून सरकार ने हिंदी भाषेची सक्ती करू नये हीच स्वराज्य संघटनेची देखील मागणी आहे. आपण जर महाराष्ट्राचा अभ्यास केला तर प्रत्येक राज्यातील माणूस हा महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी अनेक वर्षापासून येत आहे आणि पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा उद्धारनिर्वाह करत आहे. आज देखील अनेक राज्यातून लोक लाखाचा संख्येने महाराष्ट्रात येत आहेत. जर सर्व राज्यातील लोक पोट भरण्यासाठी महाराष्ट्र मध्ये येत असतील तर राज्याला हिंदीची नाही तर देशाला मराठी भाषेची गरज आहे, त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार ने हिंदीची सक्ती केलेला निर्णय मागे घेऊन देशाला मराठी भाषा शिकण्याची सक्ती करावी हीच आमच्या संघटनेची मुख्य मागणी आहे आणि त्यासाठी लवकरच संघटनेचा माध्यमातून पत्र व्यवहार करणार असून शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल असे देखील ॲड जय गायकवाड यांनी सांगतले .






























