Homeशहरज्ञानगंगा कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जर्मन नर्सिंग भरती व जर्मन भाषा प्रशिक्षणावरील मार्गदर्शन...

ज्ञानगंगा कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जर्मन नर्सिंग भरती व जर्मन भाषा प्रशिक्षणावरील मार्गदर्शन संपन्न

ठाणे दि. १२ ( प्रमोद दळवी )  : ज्ञानगंगा शिक्षण संकुलांतर्गत कार्यरत ज्ञानगंगा कॉलेज ऑफ नर्सिंग, ठाणे यांच्या माध्यमातून जी.एन.एम. (GNM) विद्यार्थ्यांसाठी जर्मन नर्सिंग भरती तसेच जर्मन भाषा प्रशिक्षण या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना परदेशातील करिअरच्या संधींबाबत जागरूक करून त्यांना योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात निरव देवपुरा आणि सौ. श्वेता जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी जर्मनीमधील नर्सिंग क्षेत्रातील वाढत्या रोजगार संधी, जर्मन भाषा शिकण्याचे महत्त्व, आवश्यक प्रशिक्षण, भरती प्रक्रिया तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, जर्मन भाषा आत्मसात करून जी.एन.एम. शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नर्सिंग क्षेत्रात उत्कृष्ट रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या क्षेत्रात सुरुवातीच्या टप्प्यातच सुमारे चार लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळण्याची संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक उन्नती होण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीलाही मोठी चालना मिळू शकते.

या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधींचे दालन खुले झाले असून त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी नवी दिशा प्राप्त झाली आहे. कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. अनेक विद्यार्थ्यांनी जर्मन भाषा प्रशिक्षण घेण्याची तसेच परदेशात करिअर घडविण्याची इच्छा व्यक्त केली. सदर कार्यक्रम ज्ञानगंगा महाविद्यालयाच्या सुसज्ज ऑडिटोरियममध्ये पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानगंगा कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या प्रा. शशिकला थोटा मॅडम, उपप्राचार्या प्रा. कल्याणी तेजे मॅडम, सीओओ डॉ. वंदना शर्मा मॅडम, पीआरओ प्रा. अनिल आठवले सर तसेच प्राध्यापिका समीक्षा ठोंबरे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. ज्ञानगंगा शिक्षण संकुलाच्या संचालिका डॉ. अनिता पाटील मोरे मॅडम संचालक व शैक्षणिक सल्लागार डॉ.अमित मोरे सर यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेमुळे हा उपयुक्त व विद्यार्थीहिताचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘प्रतिस्पर्ध्याकडून मित्राकडे’: विराट कोहलीने केन विल्यमसनसाठी मनापासून निरोप दिला | क्रिकेट बातम्या

विराट कोहली आणि केन विल्यमसन (पीटीआय फोटो) न्यूझीलंडच्या महान फलंदाजाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने केन विल्यमसनला...

‘मार्ड सदस्य नाही’: कोण आहे सेजल पवार? ‘पुरुषांच्या मृतदेहाचे प्रायव्हेट पार्ट’ विनोदामुळे वादाच्या केंद्रस्थानी...

एमबीबीएसचा विद्यार्थी वादाच्या केंद्रस्थानी मुंबई: मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पिटलशी संबंधित एमबीबीएस पदवीधर सेजल पवार या विद्यार्थिनीने...

नोकरीचे आश्वासन देऊन तंत्रज्ञांची फसवणूक केल्याप्रकरणी प्लेसमेंट फर्मच्या मालकाला ताब्यात घेतले

प्राथमिक पोलिस तपासात किमान 20 उमेदवारांची या फर्मने फसवणूक केली असावी पुणे : पाच सॉफ्टवेअर अभियंत्यांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध...

आर प्रज्ञानंधा आणि वैशाली ‘गोल्डन चेस बहिण’ बनण्यापूर्वी; त्यांच्या आईने पाया बांधला: नागलक्ष्मीने दोन...

जेव्हा आर प्रग्नानंद नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय बनला, तेव्हा जगाने तरुण ग्रँडमास्टरच्या तेजाचा आनंद साजरा केला. निश्चितच, त्यांचा विजय भारतासाठी अभिमानास्पद होता,...

नोकरीच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नका: महा मेट्रो

पुणे : मेट्रो प्रशासनाने नोकरी इच्छूक आणि नागरिकांनी खोट्या भरतीच्या जाहिरातींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.प्रशासनाने म्हटले आहे की "बेईमान घटक" अनैतिक...

error: Content is protected !!