Homeशहरउल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा...

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांची प्रमुख उपस्थिती

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं – १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्ल यांनी प्रमुख उपस्थिती लावून जिमच्या मालकांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या नव्या व्यावसायिक उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी अशा दर्जेदार फिटनेस सेंटरची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील युवक-युवतींसह सर्व वयोगटातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन निरोगी आणि तंदुरुस्त जीवनाचा संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी केले. FIT & PRO Unisex Gym मध्ये अत्याधुनिक व्यायाम उपकरणे, प्रशिक्षित मार्गदर्शक आणि महिलांसह सर्वांसाठी सुरक्षित व दर्जेदार फिटनेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट दर्जाची व्यायामाची सुविधा आपल्या जवळच मिळणार असून, आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यास हा उपक्रम निश्चितच मोलाचे योगदान देणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास विभागप्रमुख विनोद सलेकर, प्रमोद पांडेय, समाजसेवक गुड्डू दीक्षित, राजन मिश्रा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. उपस्थितांनी नव्या जिमच्या सुविधांची पाहणी करून या उपक्रमाचे कौतुक केले.सोहळ्याच्या शेवटी हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी FIT & PRO Unisex Gym च्या संपूर्ण व्यवस्थापन व टीमला भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत हा उपक्रम परिसरातील नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगर-१ यांच्या वतीने भव्य...

उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ कोटी २५ लाखांची सायबर फसवणूक उघड

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची तब्बल ५७ कोटी २५ लाख ४४ हजार २८४ रुपयांची सायबर फसवणूक केल्याचे...

स्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी  )  : स्वातंत्र्य दिन तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात...

उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : ८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख प्राथमिक आरोग्यसेवा उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, दर्जेदार...

उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय; Google Maps वर नजर ठेवत आता कंट्रोल रूममधून वाहतूक...

उल्हासनगर  दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली...

error: Content is protected !!