Homeशहरउल्हासनगरात सर्व महानगरपालिका शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उपक्रम : शाळेच्या पहिल्या दिवशी...

उल्हासनगरात सर्व महानगरपालिका शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उपक्रम : शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत व मार्गदर्शन

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व महानगरपालिका शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सोमवारी दि.१५ जुन, २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. शासन निर्देशानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी दि.१५ जुन, २०२६ रोजी लोक प्रतिनिधी, उल्हासनगर महानगरपालिकेचे वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी महानगरपालिकांच्या शाळांना भेटी देऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत व मार्गदर्शन करण्यात आले.

त्यास अंबरनाथ विधानसभा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महानगरपालिकेचा शहीद भगत सिंग हिंदी विद्यालय (मनपा शाळा क्र. ५) उल्हासनगर ५ येथे भेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तके व स्वतः मार्फत विद्यार्थ्यांना वह्या व छत्रींचे वाटप करण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिकेचे महापौर अश्विनी निकम , उप महापौर अमर लुंड, स्थायी समिती सभापती कलवंतसिंह सोहता, गटनेता अरुण आशान ,सभापती, शिक्षण समिती, व सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक यांनी त्यांच्या प्रभागातील महानगरपालिकेच्या शाळांना तसेच उल्हासनगर महानगरपालिकेतील वर्ग १ व २ चे अधिकारी यांनी सुद्धा भेटी देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत व मार्गदर्शन केले. भेटी दरम्यान नवगतांचे स्वागत पुष्पवृष्टि तसेच पुष्प देऊन करण्यात आले. सबंधित मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण व मार्गदर्शन केले. जसे मनपा शाळा क्र. १८ च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक व फॅन्सी ड्रेस परिधान करून महापौर अश्विनी कमलेश निकम यांचे स्वागत केले.

मनपा शाळा क्र. १७ व २७ मध्ये इ. १ ली च्या विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे व मनपा शाळा क्र. ८,२९ व ३० यांनी विद्यार्थ्यांच्या तळ पायाचे ठसे एक आठवण म्हणून घेण्यात आले. तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी लाडू व चॉकलेटचे वाटप करून विद्यार्थ्यांचा आजचा पहिला दिवस गोड करण्यात आला.

महानगरपालिकेच्या ८ शाळांमधील ४० वर्ग खोल्या ह्या डिजिटल करण्यात आलेल्या असून महापौर अश्विनी निकम यांनी हिंदी माध्यमांच्या शाळा डिजिटल करण्याकरीता पावले उचलली आहे. तसेच मा. शिक्षण सभापती यांनी उल्हासनगर महानगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा लवकरच सुरू करणार असल्याचे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप लवकरच करणार आहे असे जाहिर केले. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत गुण संपादन करीत आहेत. त्यामुळे समाजातील सर्व पालकांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा : शहराच्या विकासाचा संकल्प; आधुनिक सुविधा,...

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन शनिवारी ८ ऑगस्ट २०२६ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागील बाजूस असलेल्या...

उल्हासनगरच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शिक्षादानाचा अनोखा उपक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्विमिंग पूल, विराट...

RRR पुन्हा एकत्र; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य, संघटनेच्या एकजुटीला नवी बळकटी

उल्हासनगर दि. ७ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या शिवसेनेच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी एक भावनिक आणि प्रेरणादायी घटना नुकतीच घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंह...

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित...

उल्हासनगरातील सात मजली ‘आशालोक’ इमारतीला भीषण आग : ४९ फ्लॅटधारकांची सुखरूप सुटका, आठ दुचाकी...

उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प - ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह...

error: Content is protected !!