उल्हासनगर दि १० : उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून शिक्षकांच्या प्रशिक्षणाकरीता आयुक्त तथा प्रशासक मनिषा आव्हाळे यांनी दिलेल्या निर्देशान्वये डॉ. दिपाली चौगले उपायुक्त (साप्रवि), डॉ. सुनिल लोंढे सहा. आयुक्त (प्रशासन) व श्रीम. मयुरी कदम, सहा. आयुक्त (शिक्षण) गणेश पवार वरिष्ठ लिपिक यांनी महापालिका सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती.

सदरच्या प्रशिक्षणाचे मार्गदर्शक श्रीम. स्वाती सांब्राणी व श्रीम. शिवानी शर्मा यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. श्रीम. मनिषा आव्हाळे (भाप्रसे) आयुक्त तथा प्रशासक यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले व उपस्थित शिक्षक वर्ग यांचेसोबत चर्चा केली.

श्रीम. स्वाती सांब्राणी व श्रीम. शिवानी शर्मा यांनी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन दैनंदिन शाळेमधील वातावरणात विद्यार्थ्यांना शिकवताना होणारे फायदे बाबत सांगितले. सदर प्रशिक्षणामुळे शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यास आणि प्रशिक्षणाव्दारे होणारी मदत व ज्यामुळे विद्यार्थ्यांकरीता सदृढ शालेय वातावरण तयार होईल. ज्यामध्ये मुलांच्या मानसिक आरोग्याच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि त्या पूर्ण करणेबाबत मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणास उल्हासनगर महानगरपालिकेचे शिक्षक वर्ग मोठया संखेने उपस्थित होते.






























