Homeशहरउल्हासनगरातील आशेळेपाड्यात नशेखोर टोळीची दहशत : जवळपास सात ते आठ जणांवर...

उल्हासनगरातील आशेळेपाड्यात नशेखोर टोळीची दहशत : जवळपास सात ते आठ जणांवर धारदार शास्त्राने हल्ला

  • अनेक वाहनांची तोडफोड
  • नागरिकांचा रस्त्यावर उतरून पोलिसांना घेरावा
  • नशेखोर टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी

उल्हासनगर दि १० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरात काही नशेखोर टोळीने सात ते आठ जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करत रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या उल्हासनगराती आशेळेपाडा परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांना घेराव घालत या नशेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली.

उल्हासनगरातील कॅम्प  नंबर ४ परिसरातील आशेळेपाडा इथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास काही नशेखोर  टोळीने हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करत सुटले. त्यांनी सुमारे सात ते आठ जणांवर हल्ला केला. इतकेच नव्हे तर त्यांच्या हातातील धारदार हत्यारांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या २०  ते २५  वाहनांची तोडफोड केली. त्या रिक्षा ,स्कूटर, मोटरसायकल फोर व्हीलर गाडी आधी गाड्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतरले. त्या ठिकाणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडवळ व इतर कर्मचारी येतात संताप्त नागरिकांनी त्यांना घेरावा घालत. या नशेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली. आशेळेपाड्यात या नशेखर टोळीचा धुडगूस वाढत चालला असून पोलिसांनी त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा असाही संतप्त सवाल नागरिकांनी केला. इतकेच नव्हे तर या नशेखोर  टोळीने एका लहान मुलावर देखील हल्ला केला. काही नागरिक रस्त्यावरून जात असताना या टोळीने हातातील  चाकू फेकून देखील त्यांना जखमी केले.

जोपर्यंत या नशेखोर  टोळीच्या आईबापाना पोलीस अटक करत नाही तोपर्यंत ही पोरं सुधारणार नाही असा संताप्त सवाल नागरिकांनी पोलिसांना केला. या नशेखोर टोळींकडे हत्यार कुठून आली याचाही तपास पोलिसांनी करावा असा प्रश्न नागरिकांनी केला .पोलीस कारवाई करत नसल्याने तुम्ही या नशेखोर टोळीला सपोर्ट करता का असा प्रश्न संताप्त महिलांनी पोलिसांना केला आहे .या गुन्हेगारांनवर  पोलिसांचा वचक राहिला नाही अशा घटना वारंवार घडत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

या घटनेची माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोराडे यांनी त्या ठिकाणी जाऊन नागरिकांकडून माहिती घेतली. तसेच या घटनेबाबत संताप व्यक्त करीत पोलिसांना या नशेखोर  टोळींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत धनंजय बोडरे यांनी सांगितले उल्हासनगर पोलीस प्रशासन आहेत की नाही , सर्वसामान्य लोकांनी जीव मुठीत घेऊन राहायचं, लहान लहान मुलं गुन्हेगारीकडे वळतात पोलीस काही करू शकत नाही. तीच मुलं इथं दहशत माजावतात, नंग्या तलवारी व धारदार कोयते घेऊन फिरतात, ते निरपअपराध  लोकांना मारतात, डोकी फोडतात, उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान करतात ,घरांचा नुकसान करतात, तरी पोलीस प्रशासन काहीच करू शकत नाही. अक्षरशा या शासनाची लाज वाटायला लागली ज्या पद्धतीने कारभार चाललेला आहे गुन्हेगार मोकाट आहेत, नशेखोर  मोकाट आहेत ,आणि सर्वसामान्य लोक भरडले जात आहे. असे प्रकार वारंवार शहरात घडत आहेत. इथे नशेखोरांचा हड्डा झालेला आहे. आणि गुन्हेगारींचा हड्डा झालेला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त कोळी व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडवळ यांना वारंवार सांगितले आहे इथं लोक भरडली जातात, अक्षरशा लोकं तडफडत आहेत, सागळी लोक इथून सोडून जात आहेत, अशा नशेखोर टोळींवर कारवाई केली नाही तर हा मोर्चा सरळ पोलीस ठाण्यावरील आम्ही आनु इथे मरण्यापेक्षा पोलीस स्टेशनला येऊन थांबू आणि मग पोलीस काय करतात ते बघतो. मी त्यांना सूचना विनंती केली आहे. हात जोडून पोलीस आयुक्तांना विनंती आहे की आपण या ठिकाणी लक्ष घाला. सर्वसामान्या  लोकांचे जीवन सुखकर करा असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी सांगितले.

फोडण्यात आलेल्या सर्व वाहनांचा पोलिसांनी पंचनामा केला असून पोलिसांनी त्या अज्ञात हल्ल्याकोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमागचा नेमकं कारण काय आहे. हे या टोळीला पकडण्यात आल्यावरच कळणार असल्याचे बोलले जात आहे या घटनेमुळे आशेळेपाडा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

या ठिकाणी पोलीस चौकी झाली पाहिजे, या टोळीला पोलिसांनी त्वरित पकडून त्यांची धिंड काढण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. काही दुकानदारांच्या सामन्याचे ही नुकसान केले आहे. या नशेखोर  टोळीच्या दहशतीमुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

राज्यात टीईटी नकोच- शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांची भूमिका

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ): टीईटीचा पेपर फुटल्याने तो रद्द झाला असून ही टी ई टी राज्यात नकोच असल्याची भूमिका शिक्षक महासंघ...

एकाच दिवशी आठ जणांना सर्पदंश : मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने सर्वांना मिळाले जीवदान

उल्हासनगर दि.२७ ( प्रमोद दळवी ) : पावसाळा सुरू होताच उल्हासनगर शहरातील कॅम्प नं- ५  परिसरातील विविध भागात राहणाऱ्या ८ जणांना एकाच दिवशी सर्पदश...

नीरज चोप्रा आशियाई खेळ 2026 मध्ये भाग घेणार, AFI ने पुष्टी केली | अधिक...

नीरज चोप्रा (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेईल कारण तो...

शिया धार्मिकतेने आणि स्मरणाने मोहरममध्ये ‘पीडितांची संध्याकाळ’ चिन्हांकित करतात

मुंबई : मोहरमच्या १० व्या आशुरानंतर करबलाच्या शहीदांसाठी मिरवणूक, प्रार्थना आणि सार्वजनिक शोकचा दिवस शुक्रवारी संपला, शहरातील शेकडो शोककर्ते संध्याकाळी माझगाव येथील...

error: Content is protected !!