Homeशहरपुन्हा असा प्रकार घडला आणि जनतेने त्यांना चोप दिला तर त्यांच्यावर गुन्हा...

पुन्हा असा प्रकार घडला आणि जनतेने त्यांना चोप दिला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे – आमदार सुलभाताई गायकवाड

  • पोलिसांनी त्या मुलांना त्वरित अटक करावी आमदार सुलभा गायकवाड यांची मागणी

उल्हासनगर दि ११ ( प्रमोद दळवी ) : आशेळेपाडा इथे काही नशेखोर टोळीने हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावरील  वाहनांची तोडफोड करीत काही निष्पाप नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आमदार सुलभाताई  गायकवाड यांनी पोलिसांनी त्या मुलांना त्वरित अटक करावी. असे प्रकार पुन्हा इथे घडले आणि पब्लिकने त्यांच्यावर हात उचलला तर माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर आणि जनतेवर गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे  असा इशारा आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पोलिसांना दिला.

उल्हासनगरातील कॅम्प  नंबर ४ परिसरातील आशेळेपाडा इथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास काही नशेखोर टोळीने हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावरील  अनेक वाहनांची तोडफोड करत नुकसान केले. तसेच नाहक रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती आमदार सुलभाताई गायकवाड यांना मिळताच त्यांनी त्या  परिसरात धाव घेऊन नागरिकांकडून माहिती घेतली.

ज्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती त्याची देखील पाहणी केली. ही घटना पाहून संताप झालेले आमदार सुलभाताई गायकवाड यांनी त्वरित ॲक्शन मोडवर येऊन कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिसांचा समाचार घेतला. तसेच या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची पाहणी करून त्यांच्या कुटुंबियांकडे चौकशी देखील केली. काय मदत लागली तर मी आहे असे आश्वासन देखील नागरिकांना दिले. या घटने बाबत आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पोलिसांना या घटनेचा सखोल तपास करून त्वरित या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची त्यांनी मागणी केली.

जर त्यांना अटक केले नाही  तर आपण या घटनेबद्दल आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी पोलिसांना दिला. पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेतेची काळजी घ्यायला हवी. अशी दहशत मोजणाऱ्यांना चांगला सबक शिकवायला हवा असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. जर या मुलांना आता अटक केली नाही जर याच्या पुढे असे जर प्रकार इथे घडले आणि पब्लिकनी त्यांच्यावर हात उचलला तर  माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा माझ्या कुठल्याही जनतेवर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे असा इशारा आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पोलिसांना दिला. जर हे हल्लेखोर अल्पवयीन असतील तर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहत पाठवावे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. नुसते त्यांना ताब्यात घेऊन सोडू नये असाही इशारा आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पोलिसांना दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

राज्यात टीईटी नकोच- शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांची भूमिका

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ): टीईटीचा पेपर फुटल्याने तो रद्द झाला असून ही टी ई टी राज्यात नकोच असल्याची भूमिका शिक्षक महासंघ...

एकाच दिवशी आठ जणांना सर्पदंश : मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने सर्वांना मिळाले जीवदान

उल्हासनगर दि.२७ ( प्रमोद दळवी ) : पावसाळा सुरू होताच उल्हासनगर शहरातील कॅम्प नं- ५  परिसरातील विविध भागात राहणाऱ्या ८ जणांना एकाच दिवशी सर्पदश...

नीरज चोप्रा आशियाई खेळ 2026 मध्ये भाग घेणार, AFI ने पुष्टी केली | अधिक...

नीरज चोप्रा (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेईल कारण तो...

शिया धार्मिकतेने आणि स्मरणाने मोहरममध्ये ‘पीडितांची संध्याकाळ’ चिन्हांकित करतात

मुंबई : मोहरमच्या १० व्या आशुरानंतर करबलाच्या शहीदांसाठी मिरवणूक, प्रार्थना आणि सार्वजनिक शोकचा दिवस शुक्रवारी संपला, शहरातील शेकडो शोककर्ते संध्याकाळी माझगाव येथील...

error: Content is protected !!