उल्हासनगर दि . ४ : मालमत्ता करापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी प्रलंबित असलेल्या इसमाकडे महापालिकेचे मालमत्ता कर वसुली पथक कर्तव्यास गेले असता अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्या इस्माविरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पालिकेने प्रसिद्धी पत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर महानगरपालिका मालमत्ता विभाग करापोटी मोठया प्रमाणावर थकबाकी प्रलंबित असल्याने मालमत्ता कर वसुलीची मोहिम चालु आहे. त्याअनुषंगाने युनिट क्र. ८ मधील वार्ड क्र. ५६ मालमत्ता क्रमांक ५६DI०११८८१६०० सेक्रेटरी, पत्ता- सतनाम साखी अपार्टमेंट, बॅरेक नंबर २००४, रुम नं. २० सिंधी टेऊराम धरमशाळा जवळ, उल्हासनगर-५ या मालमत्ताचे करापोटी वर्ष २०२५-२६ पर्यंत मालमत्ता कर थकबाकी रु. २१,३४,१५०/- आहे.
त्या ठिकाणी मालमत्ता कर वसुलीकामी विभाग प्रमुख श्रीम. निलम चंद्रकांत कदम, कर निर्धारक व संकलक, युनिट क्रमांक ८ मधील शरद बलीया, सचिन निकम कर निरिक्षक व वसुली लिपिक गेले असता. सतपालसिंग जयमलसिंग चावला यांनी मालमत्ता कर वसुली कर्तव्यास असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे सोबत हुजत घालून धक्काबुक्की करुन धमकी देवून कर्तव्य करण्यास अडथळा निर्माण केला. सदर घटनेबाबत आयुक्त, उमपा व मा. अतिरिक्त आयुक्त, उमपा यांच्या निर्देशानुसार संबंधित व्यक्ती विरुध्द या प्रकरणी हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये सतपालसिंग जयमलसिंग चावला यांचेविरुध्द भारतीय न्यायसहिंता २०२३ चे कलम १३२, ३५१(२) प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.





























