Homeशहरमुसळधार पावसात अंबरनाथ मध्ये जवळपास १२ झाडे कोसळली : अंबरनाथ अग्निशामन दलाच्या...

मुसळधार पावसात अंबरनाथ मध्ये जवळपास १२ झाडे कोसळली : अंबरनाथ अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाडे पूर्ण तोडून वाहतुकीसाठी रस्ते केले मोकळे

अंबरनाथ दि. १ ( प्रमोद दळवी ) : मंगळवारी सायंकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी जवळपास १२  झाडे कोसळल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर तारेवरची कसरत करत ठीक ठिकाणी पडलेली ही झाडे बाजूला करून रस्ते मोकळे केले.

मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अंबरनाथ शहरात धोकादायक स्थितीत असणारी झाडे या मुसळधार पावसात कोसळले आहेत. कोसळलेल्या झाडांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतूक ठप्प झाली होती. तर एके ठिकाणी विद्युत वाहिनीवर भले मोठे झाड कोसळल्याने विद्युत तारा देखील निखळून पडल्या होत्या. त्या परिसरातील विद्युत पुरवठा ही खंडित झाला होता. अंबरनाथ अग्निशामन प्रमुख भागवत सोनोने व त्यांच्या टीमने बुधवारी सकाळपासून जवळपास १२  ठिकाणी कोसळलेली झाडे पूर्ण तोडून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला.

अंबरनाथ येथील फॉरेस्ट नाका परिसरात, आनंद नगर टी सर्कल जवळ, नवरे नगर परिसरातील गणपती मंदिराजवळ, हुतात्मा चौक पद्मावती कॉम्प्लेक्स जवळ, शिवलिकनगर गॅस गोडाऊन जवळ, मलागिरी सोसायटी बिल्डिंग नंबर २६,२७  जवळ, लादीनाका मंदाकिनी शाळेजवळ, न्यू बालाजी नगर परिसरात, ग्रीन सिटी रोड मोतीराम प्राईड जवळ, गायकवाड पाडा परिसरात, अशा जवळपास १२ ठिकाणी दिवसभर पडत असणाऱ्या मुसळधार पावसात झाडे कोसळली होती. पडत असणाऱ्या मुसळधार पावसात अंबरनाथ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तारेवरची कसरत करत झाडे बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. मुसळधार पाऊस सुरू असल्यास धोकादायक झाडाजवळ नागरिकांनी उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी नागरिकांनी आसरा घ्यावा, असे आव्हान अग्निशमन प्रमुख भागवत सोनोने यांनी केले आहे.

तसेच बुधवारी  दिवसभर अंबरनाथ  शहरात  सूरू  असलेल्या पावसाचा जोर पाहता मुख्याधिकारी  उमाकांत  गायकवाड, नगराध्यक्षा तेजश्री  करंजुले  नगरसेवक  अभिजित  कारंजुले,  नगरसेविका  रोहिणी  भोईर  आणि  इतर  नपा  अधिकारी  सह संपूर्ण  शहरातील  परिस्थितीचा  आढावा  घेतला.  विशेष  म्हणजे  मुख्याधकारी  यांनी  अग्निशमन च्या  Quick  रिस्पॉन्स  वेहिकल  मध्ये  जाऊन संपूर्ण पडलेल्या  झाडांचा  तसेच  वॉटर  लोगिंगचा  आढावा  घेतला,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बढती मिळालेल्या उल्हासनगरातील नवनिर्वाचित पोलीस अधिकाऱ्यांना आमदार कुमार आयलानी यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याने उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी...

‘नियोजित, तालीम, अंमलात आणली?’ : केतन अग्रवाल खून प्रकरणात 3 अयशस्वी बोली, लोहगड पडणे...

तपासकर्ते गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करत आहेत आणि अग्रवाल यांचा फोन तपासत आहेत, जो गोयल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन...

एर्लिंग हॅलँड स्कोअर करतो, नंतर त्याच्या आतल्या वायकिंगला बाहेर काढण्यापूर्वी काउबॉय गियर डॉन करतो

नॉर्वेचा एर्लिंग हॅलंड (९) विश्वचषक फेरीच्या ३२ नंतर पोझ देत आहे (एपी फोटो) नॉर्वेचा स्टार स्ट्रायकर एर्लिंग हॅलँडने फिफा विश्वचषक फेरीच्या 16 मध्ये...

पालकांच्या वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून तरुणाचा मुंबईतील इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न; शेजाऱ्यांनी वाचवले | मुंबई...

ही घटना दहिसर पूर्व येथील जनकल्याण बिल्डिंगमध्ये घडली असून त्या युवकाची मावशी राहते. मुंबई : बुधवारी दहिसर पूर्वेतील एका १८ वर्षीय मुलाने इमारतीच्या...

‘बस आज की रात है जिंदगी’: केतन अग्रवालने कौटुंबिक कार्यक्रमात नाचलेले गाणे आता एक...

7 मे रोजी कार्यक्रमात सादर झालेल्या गायिका रीतू शर्माने कार्यक्रमातील आनंदी वातावरणावर प्रकाश टाकणारा एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे: एकेकाळी कौटुंबिक...

error: Content is protected !!