Homeशहरउल्हासनगर मध्ये मुसळधार पाऊस : शहरातील जिजामाता कॉलनी जलमय: शेकडो नागरिकांच्या घरात...

उल्हासनगर मध्ये मुसळधार पाऊस : शहरातील जिजामाता कॉलनी जलमय: शेकडो नागरिकांच्या घरात शिरले पाणी : पालिका प्रशासना विरोधात नागरिक संतप्त

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी )  : मंगळवारी रात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर -४  परिसरात असणाऱ्या जिजामाता कॉलनी मध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने त्या परिसरात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो नागरिकांच्या घरात हे पाणी शिरल्याने त्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. या जलमय परिस्थितीला उल्हासनगर महानगरपालिका जबाबदार असून पालिका प्रशासना विरोधात नागरिकांनी संतप्त व्यक्त केला आहे.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ४ परिसरात जिजामाता कॉलनी हे परिसर असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. त्या ठिकाणी जवळच मोठा नाला असून त्या नाल्याची योग्य पद्धतीने साफसफाई करण्यात न आल्याने मंगळवारी रात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चोकअप झालेल्या नाल्यातील सांडपाणी हे थेट त्या परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले. मध्यरात्रीपासून त्या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची अर्धी घरे पाण्याखाली आले आहेत. याशिवाय जिजामाता कॉलनीतून गुडघ्यावर भरलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांना बाहेर पडावे लागले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेक नागरिकांचे संसार उपयोगी वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत नागरिकांनी संतप्त व्यक्त करीत सांगितले जवळपास पाच सहा वर्षांपासून जिजामाता कॉलनी परिसरात पाणी साचत असते. या परिसरातील नाल्यांची योग्य पद्धतीने साफसफाई केली जात नसल्यामुळे नाल्याचा पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. हि समस्या गेल्या अनेक वर्षापासून असून देखील या समस्या कडे कोणीही  लक्ष देत नाही. त्यामुळे या पावसात देखील या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. या मुसळधार पावसात आमच्या घरात पाणी गेल्याने आम्ही उघड्यावर आलो आहे. आमच्या सर्वच वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आम्ही आता राहायचं कुठं हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. इतकेच काय तर मुलांच्या शाळेची दप्तर आणि पुस्तक देखील या पावसाच्या पाण्यात भिजून खराब झाले आहेत. कालपासून आम्ही कॉलनीच्या बाहेरच उभा राहून आमच्या घरात शिरलेले नाल्याचे पाणी पाहत आहे असे देखील काही नागरिकांनी सांगितले. अद्याप पर्यंत आमच्या घराचे झालेले नुकसान व त्या ठिकाणी झालेली पूर परिस्थिती पाहण्यासाठी महापालिकेचे प्रशासन अधिकारी या ठिकाणी आलेले नाही असे  देखील नागरिकांनी सांगितले. यावरून उल्हासनगर महानगरपालिकेची नालेसफाई कशा पद्धतीने झाली आहे हे या जलमय परिस्थितीवरून दिसून येत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल हत्या: लोहगड खडक पडल्यानंतर सिया गोयलचा पीडितेचा फोन होता; पोलिसांना ‘पुरावा छेडछाड’चा...

घटनेनंतर गोयल यांच्या ताब्यात असलेला अग्रवाल यांचा मोबाईल फोन तपासणारे तपासत आहेत. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा तपास त्याच्या मोबाईल फोनकडे वळवला...

ज्ञान गंगा एज्युकेशन ट्रस्टच्या बी.एड. महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

ठाणे दि. १ ( प्रमोद दळवी ) : ज्ञान गंगा एज्युकेशन ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.), ठाणे येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती...

फिफा विश्वचषक: 1990 मध्ये इटलीनंतर सलग चार विजयांसह सुरुवात करणारा मेक्सिको हा पहिला संघ...

मेक्सिकोचे खेळाडू विश्वचषक फेरीच्या 32 सामन्यानंतर आनंद साजरा करताना. (एपी फोटो) मेक्सिको सिटी: मेक्सिकोच्या स्वप्नातील फिफा विश्वचषक 2026 मोहिमेला गती मिळत आहे कारण...

इशारे दुर्लक्षित केले? चेंबूरच्या 11व्या रस्त्यावर मंगळवारच्या जीवघेण्या अपघातापूर्वी BMC नोटीस ध्वजांकित झाडांच्या मुळांचे...

मुंबईत पावसात स्कूल बसवर झाड कोसळले, 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुंबई: चेंबूरमधील रोड क्रमांक 11 वर पीपळाचे झाड कोसळल्याने मंगळवारी दुपारी 11 वर्षीय...

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

error: Content is protected !!