Homeशहरमहिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून पळणाऱ्या सराईत चोरट्यांवर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची...

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून पळणाऱ्या सराईत चोरट्यांवर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची झडप : ९ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

उल्हासनगर दि . ११ ( प्रमोद दळवी ) : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळ्या जबरीने हिसकावून चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे . पोलिसांना दोन आरोपींना अटक करण्यात यश आले असून त्यांच्याकडून ३  चोरीच्या दुचाकीसह तब्बल ९ लाख ८१  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे ठाणे, कल्याण आणि बदलापूर परिसरातील अनेक जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याच्या साखळ्या हिसकावण्यासाठी चोरीच्या मोटरसायकलीचा वापर करणाऱ्या दोन सराईत आरोपींना उल्हासनगर गुन्हे शाखा घटक – ४ ने अटक केले असून आरोपींमध्ये हुसेनीमुख्तार इराणी उर्फ गजनी आणि गुलाम अभ्यास अमीरअली इराणी  या दोघांचा समावेश आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेचे शेखर भावेकर यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचून मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.  आरोपींकडून  तीन चोरीच्या दुचाकी सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळ्या आणि इतर दागिने असा एकूण ९ लाख ८१  हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विठ्ठलवाडी कासारवडवली, कळवा, हिललाईन, शिवाजीनगर तसेच बदलापूर पूर्व पश्चिम पोलीस ठाण्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक- ४ च्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपीकडून आणखी गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मोशी येथील छत्रपती संभाजी...

पाणीटंचाईच्या समस्येबाबत आमदारांची एमआयडीसी, महापालिका जलविभाग व वीज विभागासोबत बैठक

पीडब्ल्यूडी विभागाकडून कामांचा आढावा उल्हासनगरदि. ११ (प्रमोद दळवी ) : शहरातील पाणीटंचाईच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार कुमार आयलानी यांनी महापालिकेच्या जलपुरवठा विभाग, एमआयडीसी तसेच...

‘दुसरीकडे भेटू’: रियान पराग खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर अपडेट शेअर करतो

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याच्या खांद्यावर गुरुवारी येथील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध ऑर्थोपेडिक...

‘मी खूप भोळा होतो’: प्रणित मोरेच्या स्टँड-अप शोमध्ये पुरुषाच्या प्रेताच्या प्रायव्हेट पार्टबद्दल विनोद केल्याबद्दल...

डॉक्टर सेजल पवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टरने नंतर माफी मागितली आणि सांगितले की लोक नाराज का आहेत हे तिला समजले आणि तिच्या शब्दांची...

CJP चे अभिजीत दिपके म्हणतात, सार्वजनिक आंदोलनानंतर राजकीय पक्ष काढण्यात काहीच गैर नाही

पुणे: सार्वजनिक आंदोलनानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्यात काहीच गैर नाही, असे सांगून झुरळ जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी सायंकाळी...

error: Content is protected !!