- अनेक युवक युवतींनी भारतीय जनता पक्षाच्या कामावर विश्वास दाखवून प्रवेश
उल्हासनगर दि.१२ ( प्रमोद दळवी ) : भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर कॅम्प नंबर ४ ची कार्यकारणीची घोषणा उल्हासनगरातील कॅम्प नंबर ४ परिसरातील सार्वजनिक हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मंडळ ४ चे अध्यक्ष स्वप्निल पगारे यांच्या नेतृत्वाखालील अनेक युवक युवतींनी भारतीय जनता पक्षाच्या कामावर विश्वास दाखवून प्रवेश केला. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला शतप्रतिशत यश मिळवण्यासाठी संघटना मजबूत असणे गरजेचे आहे याच उद्देशाने संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे लता पगारे यांनी सांगितले
या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी ,मंडळ अध्यक्ष हरीश भाटिया, मंडळ ४ चे अध्यक्ष स्वप्निल पगारे, बंटी कुसेजा, विनोद शर्मा, मनोज पाटील रवी व्हटकर, लता पगारे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते





























