कल्याण दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” व “एक पेड मा के नाम” या शासनाच्या उपक्रमा अन्वये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यात १० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट सर्व प्रशासकीय यंत्रणा तसेच सर्वसामान्य नागरिकांसमोर ठेवले आहे.
त्या अनुषंगाने आज दिनांक १२ जुलै २०२५ रोजी निसर्ग मैत्री ग्रुप ,कल्याण पश्चिम यांचे वतीने इवा वर्ल्ड स्कूल, आरटीओ जवळ, कल्याण पश्चिम येथे तिसरे वृक्षारोपण करण्यात आले. तेथे २५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. निसर्ग मैत्री ग्रुप कल्याण या संस्थेमार्फत आतापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आंबिवली बायोडायव्हर्सिटी पार्क, आंबिवली व साधना आधार वृद्ध सेवा केंद्र डोंबिवली, या ठिकाणी आतापर्यंत एकूण १०० झाडांची लागवड करून शासनाच्या उपक्रमात खारीचा वाटा उचललेला आहे.
सदर कार्यक्रमास ॲड. शलाका अहिरे, ॲड. मीनल इनामदार, ॲड. शशांक देशपांडे, ॲड रंजना म्हात्रे, ॲड. सुनीता देवरे, ॲड. दीपश्री वंटमुरे, ॲड.तबस्सुम बैरागदार, ॲड.अनुप्रिया देशमुख, ॲड. अनुष्का अहिरे,ॲड. मयुरेश आठवले तसेच इवा वर्ल्ड स्कूल या शाळा प्रशासनाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.





























