गोवा दि. १६ ( प्रमोद दळवी ) : गोवा राज्यातील पणजी येथे लिप्स ग्रुप इंडिया ग्लोबल आयकॉन अवॉर्ड २०२६ हा भव्य आणि प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. ईशो नाईक युनियन मंत्री भारत सरकार , तसेच अमेरिकन शिक्षण संस्थेच्या संचालिका व भारतीय शिक्षणतज्ज्ञ डॉ. रंजना शर्मा, श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय मिस अर्थ व जागतिक पर्यावरण संशोधक श्रीम.वियाना पीटर्स मॅडम , क्रीडा क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधी,जपान व मालदीवशी संबंधित मान्यवर प्रतिनिधी तसेच भारतीय अभिनेत्री व मॉडेल श्रीम.रागिनी द्विवेदी मॅडम यांच्यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजपरिवर्तक, समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि जागतिक स्तरावरील नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

या प्रतिष्ठित कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील डी.लिट.डॉ.व्ही.व्ही.पोपेरे, आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) तथा भारत-नेपाळ मैत्री फोरम वैश्विक परिषद, नवी दिल्ली (राष्ट्रीय उपाध्यक्ष) यांचा सामाजिक, शैक्षणिक व आदिवासी विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभागाचा सर्वोत्कृष्ट मानला जाणारा आदिवासी सेवक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांनी महाराष्ट्रासह देश-विदेशात केलेल्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ग्लोबल आयकॉन अवॉर्ड २०२६ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार त्यांच्या दीर्घकालीन समाजसेवा, आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदानाचा गौरव करणारा ठरला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि उपस्थित मान्यवरांनी समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचे कौतुक केले. हार्दिक अभिनंदन! ग्लोबल रिसर्च सेंटर गोवा यांच्या वतीने डी.लिट.डॉ. व्ही. व्ही. पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारत-नेपाळ मैत्री फोरम वैश्विक परिषद,नवी दिल्ली. यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यावर अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाकरीता देश-विदेश व देशातील सर्व राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या उत्साहात पंजिम गोवा येथे संपन्न झाला





























