उल्हासनगर दि १४ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त उल्हासनगर मनसे शाखेच्या वतीने सकाळी अंबरनाथ येथिल हेरंब गणेश मंदिरात अभिषेक करून दुपारी शासकीय वस्तीगृहातील अनाथ मुलांना रजिस्टर / स्कूल ब्याग व शालेय साहित्याच वाटप करून याचं वस्तीगृहातील परिसरात वृक्ष रोपण करून राजसाहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शाळेत ही वृक्ष रोपण करण्यात आलं.

या कार्यक्रमाचे आयोजन मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख जिल्हा संघटक दिलीप थोरात मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव उपशहर सचिन बेंडके मुकेश सेठपलांनी रवी पाल तसेच अविनाश सुर्से समाजसेवक प्रदीप गरड मनविसेचे उपजिल्हा अध्यक्ष कल्पेश माने,शहर संघटक अशोक गरड, आशुतोष थोरात,विभाग अध्यक्ष अमोल पाटील,नटवर वासिटा, सुहास बानसोडे, प्रमोद पालकर, संजय नार्वेकर,संकेत शिंदे,राहुल राणे,जफार शेख, संजय शिंदे, मुकेश चव्हाण सचिन शिरसाठ सचिन विभुते, शोल्क बेंडके लड्डन रेन यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






























