Homeशहरउल्हासनगरातील पॅनल क्रमांक १२ मधील पाणी समस्येची महापौरांकडून पाहणी

उल्हासनगरातील पॅनल क्रमांक १२ मधील पाणी समस्येची महापौरांकडून पाहणी

उल्हासनगर दि. ६ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक १२  मधील नागरिकांना पाण्याची भीषण टंचाई असल्याने ही पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक १२  मधील सम्राट अशोक नगर, वडोल गाव तसेच आसपासच्या परिसरात मागील अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना दररोजच्या जीवनात पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने केली जात होती. विशेषतः वडोल गाव परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी जवळपास एक वर्षापूर्वी कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे हे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईनचे काम अपूर्ण राहिले असून काही भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली.

या समस्येबाबत नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे तसेच स्थानिक नगरसेविका सविता ताई तोरणे-रगडे यांनी प्रशासनाकडे सविस्तर तक्रार नोंदवली. त्यानंतर या गंभीर समस्येची दखल घेत महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. महापौरांनी वडोल गाव आणि सम्राट अशोक नगर परिसरात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नागरिकांनी पाण्याच्या अनियमित पुरवठ्याबाबत, अपूर्ण राहिलेल्या पाईपलाईन कामाबाबत तसेच कामाच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली.

यावेळी महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याचे तसेच परिसरातील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनीही महापौरांनी स्वतः येऊन समस्या ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि पाणी समस्येचे कायमस्वरूपी निराकरण लवकर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जेव्हा आशाताईंनी फ्रेंच संस्कृती आणि पाककृतीचे गुणगान गायले

2010 मध्ये, मला नऊ वर्षांच्या जुळ्या मुलांना फ्रेंच संभाषण कौशल्य शिकवण्यास सांगण्यात आले. मी पत्त्यावर पोहोचलो आणि बेल वाजवली. मी आत शिरलो...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने एनसीपी (एसपी) सोडण्याचे संकेत दिले, म्हणतात की आजच्या राजकारणात निष्ठा...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

आयपीएल 2026: ट्रिस्टन स्टब्सने आरसीबीवर विजय मिळविल्यानंतर डेव्हिड मिलरच्या आईस-कूल फिनिशचे ‘ब्रेड अँड बटर’...

ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड मिलर यांनी विजय साजरा केला (एएनआय फोटो) दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध शेवटच्या षटकात आश्चर्यकारक विजय मिळवला, डेव्हिड मिलरने...

भारतातील गैर-मेट्रो शहरांमध्ये रिअल इस्टेटच्या वाढीला चालना देणारे 7 घटक

उदयोन्मुख शहरांमधील विस्तार हा उत्तीर्ण होण्याच्या प्रवृत्तीऐवजी दीर्घकालीन संरचनात्मक बदल दर्शवतो. घरांची वाढती मागणी, जलद शहरीकरण आणि टियर-2 आणि टियर-3 मार्केटमधील ऑफिस स्पेसच्या वाढत्या...

error: Content is protected !!