Homeशहरउल्हासनगर महापालिकेत महायुतीच्या सत्तेचा मार्ग मोकळा : महापौर-उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

उल्हासनगर महापालिकेत महायुतीच्या सत्तेचा मार्ग मोकळा : महापौर-उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

  • विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाही. खासदार डॉ श्रीकांत शिंदे

उल्हासनगर दि.३० (प्रमोद दळवी ): उल्हासनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक २०२५ – २६ ची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शुक्रवारी महायुतीच्या वतीने महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आणि आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया पार पडली.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वतीने अश्विनी कमलेश निकम यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अमर लुंड यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप, शिवसेना (शिंदे गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय), साई पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि इतर महायुती घटक पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

त्या वेळी  खासदार  डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशांमध्ये एनडीएचे सरकार त्याचबरोबर राज्यांमध्ये देखील महायुतीचे सरकार आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचा सरकार जे आहे सत्ता जी आहे ती बसली पाहिजे ही इच्छा प्रत्येक कार्यकर्त्याची होती.

जरी आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो तरी या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाही अशी परिस्थिती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर महापालिकेमध्ये महापौर पदासाठी सौ अश्विनी कमलेश निकम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंड या  दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी  या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ज्याप्रमाणे केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार विकास प्रकल्पांना यशस्वीरित्या प्राधान्य देत आहे, त्याचप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिकेत महायुती सरकार स्थापन करून लोककल्याणकारी कामे केली जातील. असे देखील खासदार  डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले.

उल्हासनगर मुन्सिपल कार्पोरेशन मध्ये आता विरोधक शिल्लक राहिलेला नाही. उल्हासनगर वासियांनी महायुतीला पूर्ण मेंडेट दिलेला आहे. महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. येणाऱ्या ३ तारखेला या उल्हासनगर मुन्सिपल कार्पोरेशन मध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर मुन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये ही दोन्ही मंडळी त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहेत  या ठिकाणी मिळून करतील असे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले .

महापौर शिवसेनेचा झालेला आहे उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दोघे ठरवतील किती वर्ष कोणाचा महापौर होईल ,कुठल्या कमिटीस कोणाला मिळतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी ठरवतील पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्र म्हणून काम करेल या शहराच्या डेव्हलपमेंट साठी हे महत्त्वाचं आहे असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

महापौर पदासाठी शिंदे सेनेतून राजेंद्र चौधरी, इंदिरा पाटील, ओमी टीम समर्थक अश्विनी निकम, डिंपल ठाकूर आदी नगरसेवकांची नावे पुढे आली होती. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी माजी आमदार पप्पू कलानी व ओमी कलानी यांच्यावर विश्वास टाकत पहिल्या टर्म मध्ये निवडून आलेल्या कलानी यांचे कट्टर समर्थक व ओमी टीमचे प्रवक्ते कमलेश निकम यांची पत्नी अश्विनी निकम यांची महापौर पदासाठी नाव निश्चित करण्यात आले.

दुसरीकडे उपमहापौर पदासाठी पहिल्यांदा निवडून आलेले अमर लुंड यांचे नाव पुढे येऊन अमर लुंड यांची पत्नी कांचन लुंड दोन टर्म नगरसेवक पदी निवडून आल्या होत्या. अमर लुंड त्यांची पत्नी कांचन लुंड, भाऊ शेरी लुंड हे एकाच घरातील तीन जण नगरसेवक पदी निवडून आले आहेत. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या ३ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, आमदार बालाजी किणीकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया , गोपाळ लांडगे, प्रदीप रामचंदानी, अरुण आशान , सुनील चौधरी , राजेंद्र चौधरी, अरुण आशान  यांच्यासह भाजप, शिवसेना आणि इतर घटक पक्षांचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित...

उल्हासनगरातील सात मजली ‘आशालोक’ इमारतीला भीषण आग : ४९ फ्लॅटधारकांची सुखरूप सुटका, आठ दुचाकी...

उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प - ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह...

मुसळधार पावसाने अंबरनाथमध्ये घर नाल्यात कोसळले : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची तातडीने धाव,...

अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्व येथील कोकण नगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली....

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह...

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं - १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील पॅनल...

error: Content is protected !!