Homeताज्या बातम्याशेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी...

शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  • मुक्ताईनगर तालुक्यातील भूसंपादन प्रश्नाबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

जळगाव दि.९ जुलै : राष्ट्रीय राजमार्गच्या कामाकरिता शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, तसेच भूसंपादन करीत असताना दुजाभाव होता कामा नये, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्र. ७५३-एल (बोरगांव बुजूर्ग मुक्ताईनगर) येथील मौजे मुक्ताईनगर, अंतुर्ली व सातोड ता. मुक्ताईनगर जि. जळगांव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन दराबाबत व इतर प्रलंबीत विषयांबाबत नुकतीच विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी श्री. बावनकुळे यांनी निर्देश दिले आहेत.

इंदूर ते छत्रपतीसंभाजीनगर (एल-७५३) राष्ट्रीय महामार्गाचा मुक्ताईनगर तालुक्यातून जाणारा मार्ग काहीसा वळणाचा असून त्यामध्ये दिशा (अलाइनमेंट) बदल केल्यास संपूर्ण रस्त्याचे अंतर कमी होऊ शकते तसेच खर्चातही बचत होईल. महामार्गाच्या संदर्भात मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले भूसंपादन करण्यात आलेल्या व ज्यांना भूसंपादनाचा मोबदला दिला आहे, याबाबत शासनस्तरावर तक्रारी प्राप्त होत असल्याने याबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे. असे श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

शेत जमिनीचे भूसंपादन करताना यंत्रणांनी व्यक्तिभेद न करता सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने स्वीकारावी, जमिनीचे दहा-बारा वर्षा पूर्वीचे दर व आताचे चालू वर्षातील दर यामध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांना सुधारित दराने जमिनीचा मोबदला दिला पाहिजे. असे यावेळी राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री श्री गिरीश महाजन यांनी सुचित केले.

यावेळी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, उपस्थित होते तर दूरदृष्य प्रणाली द्वारे जिल्हाधिकारी जळगाव आयुष्य प्रसाद, यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, प्रांत अधिकारी, भूसंपादनाधिकारी, शेतकरी संघर्ष समिती मुक्ताईनगर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

error: Content is protected !!