Homeशहरवसुंधरा हा सामाजिक मराठी लघुपट बघण्यासाठी व्हीनस थेटर मध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी

वसुंधरा हा सामाजिक मराठी लघुपट बघण्यासाठी व्हीनस थेटर मध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी

  • मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करणारा मराठी सामाजिक लघुपट
  • सर्व कलाकारांचे उत्कृष्ट अभिनय

 उल्हासनगर दि. १७( प्रमोद दळवी )  : मीनाक्षी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत व निर्माता/सहाय्यक दिग्दर्शक प्रमोद दळवी यांच्यावतीने तसेच पॅनल क्रमांक १९ च्या शिवसेना नगरसेविका मीनाताई सोंडे यांच्या सौजन्याने वसुंधरा हा मराठी सामाजिक लघुपट उल्हासनगरातील व्हीनस टॉकीज मध्ये फक्त एकच शो रविवारी सकाळी ११  वाजता लावण्यात आला होता. मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या लघुपटाला पाहण्यासाठी टॉकीज मध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली होती.

वसुंधरा या मराठी सामाजिक लघुपटाचे निर्माता व सहाय्यक दिग्दर्शक प्रमोद दळवी असून लेखक/ दिग्दर्शक /संकलन विनायक मोहन जंगम आहेत. रंगभूषा नाना जाधव यांनी केली असून या लघुपट्याला पार्श्वसंगीत जय रंगराज यांनी दिले आहे. वसुंधरा या मराठी सामाजिक लघुपटात प्रमोद वि दळवी, काजल राजू कांबळे, सुवर्णा पालकर, ईश्वर अधिकार, नाना अहिरे, रमेश आखाडे, संगदीप रमेश आखाडे, दिपाली बोरसे, दर्शना केदार, परेश नेरकर, पार्थ देवकर, भगवान देवकर पुंजा जाधव, दिलीप जाधव व दिव्या जाधव या कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका निभावली आहे. वसुंधरा या मराठी सामाजिक लघुपटात मुख्य नायिका काजल कांबळे व नायक पार्थ देवकर यांनी भूमिका साकारली आहे. या लघुपटासाठी विशेष सहकार्य पूजा जाधव दिलीप जाधव व पिंपळगाव ग्रामस्थानी केले आहे. लेखक विनायक जंगम यांनी मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करणारा विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने लघुपटात मांडला आहे.

उल्हासनगर शहरातून अनेक भागातून प्रेक्षक वसुंधरा हा मराठी सामाजिक लघुपट पाहण्यासाठी आले होते. विशेषता शिवसेना नगरसेविका मीना सोंडे यांनी या लघुपटाचे ३५० तिकीट घेऊन परिसरातील महिलांना वाटप करून त्यांना हा लघुपट पाण्यासाठी पाठवले. तसेच नगरसेविका अंजली साळवे व शिवसेना महिला आघाडी शहर संघटक मनीषा भानुषाली यांनी देखील वसुंधरा या लघुपटाचे तिकीट घेऊन परिसरातील महिलांना वाटप केले. संपूर्ण टॉकीज मध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची आणि मुलींची गर्दी दिसत होती. जवळपास ५०० हून अधिक प्रेक्षकांनी वसुंधरा हा मराठी सामाजिक लघुपट पहिला. हा लघुपट खूपच सुंदर आणि चांगल्या पद्धतीने निर्माता व सहाय्यक दिग्दर्शक प्रमोद दळवी यांनी दाखवण्याचा प्रयत्न केल्यामुळे वसुंधरा या मराठी सामाजिक लघुपटाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रसारित करावा अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती.

वसुंधरा हा सामाजिक मराठी लघुपट पाण्यासाठी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या व नगरसेविका अंजली साळवे, माजी नगरसेवक शांताराम निकम, ज्येष्ठ कलाकार राजेंद्र जाधव, मानव विकास सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय भास्कर कुलकर्णी, समाजसेवक सुरेश सोनवणे, नगरसेविका सुरेखा सुरेश सोनवणे यांच्यासह सुभाष टेकडीतील मोठ्या संख्येने नागरिक हा लघुपट पाहण्यासाठी आले होते. वसुंधरा या सामाजिक मराठी लघुपटाला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. लवकरच वसुंधरा या सामाजिक मराठी लघुपटाचा दुसरा भाग भाग देखील व्हीनस थेटर मध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती निर्माता प्रमोद दळवी यांनी दिली आहे. जवळपास अर्धा तासाच्या या वसुंधरा मराठी सामाजिक लघुपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होतो. लवकरच प्रेक्षकांना संपूर्ण वसुंधरा मराठी चित्रपट उल्हासनगरतील व्हीनस थेटर मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद पाहून वसुंधरा या मराठी सामाजिक लघुपटाचा वसुंधरा या चित्रपटामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना बराच असा प्रसंग  पाहायला मिळणार आहे की त्यांचे डोळे पानोळल्या शिवाय राहणार नाही. “वसुंधरा” मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करणारा सुंदर सिनेमा, सर्वांचा उत्कृष्ट अभिनय, पत्रकार प्रमोद दळवीं यांनी विषय अत्यंत चांगल्या तऱ्हेने मांडला आहे. सर्वांनी व खास करून मुलींनी नक्की बघा असे आव्हान नगरसेविका अंजली साळवे यांनी त्यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महापालिकेतील निविदांवरून खळबळ : २० कोटींच्या संभाव्य आर्थिक नुकसानीचा आरोप : अंजली...

उल्हासनगर दि. ११ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या ‘मूलभूत सोयी सुविधा विकास योजने’अंतर्गत काढण्यात आलेल्या निविदांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मूळ...

हर घर तिरंगा’ उपक्रमात उल्हासनगरकरांनी सहभागी व्हावे – महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे

१३ ते १५ ऑगस्टदरम्यान घर, कार्यालये, कारखाने व शैक्षणिक संस्थांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन उल्हासनगर  दि. ११ ( प्रमोद दळवी )  : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...

उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा : शहराच्या विकासाचा संकल्प; आधुनिक सुविधा,...

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन शनिवारी ८ ऑगस्ट २०२६ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागील बाजूस असलेल्या...

उल्हासनगरच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शिक्षादानाचा अनोखा उपक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्विमिंग पूल, विराट...

RRR पुन्हा एकत्र; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य, संघटनेच्या एकजुटीला नवी बळकटी

उल्हासनगर दि. ७ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या शिवसेनेच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी एक भावनिक आणि प्रेरणादायी घटना नुकतीच घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंह...

error: Content is protected !!