Homeताज्या बातम्याराज्य शासनाच्या हिंदी सक्ती विरोधात उल्हासनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष...

राज्य शासनाच्या हिंदी सक्ती विरोधात उल्हासनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसेच्या वतीने शासन निर्णय परिपत्रकाची होळी.

  • शासनाने जीआर रद्द करताच मनसेने फटाके फोडत पेढे वाटून केला विजय उत्सव साजरा

उल्हासनगर दि २९ ( प्रमोद दळवी ) :  हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात राज्य शासनाचा विरोध करत उल्हासनगर येथे मध्यवर्ती शिवसेना शाखेसमोर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंदी सक्ती करणाऱ्या शासन निर्णय परिपत्रकाची होळी करण्यात आली. पण संध्याकाळी सरकारने हा हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. तर मनसेने हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी उल्हासनगरातील मनसे लालगड शाखा उल्हासनगर – ४  व कॅम्प  नंबर ३ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत पेढे वाटून विजय उत्सव साजरा केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी म्हटले की महाराष्ट्रातील लाचार सरकारने मुंबई महापालिकेतील हिंदी भाषिक लोकांना डोळ्यासमोर ठेवून मराठीचा द्वेष करत हिंदी सक्तीचा हा जीआर काढला आहे. अतिशय बिकट अवस्था या महाराष्ट्राच्या लाचार सरकारने केली. सत्ता आणि सत्तेसाठी सर्व काय. आता हा सुद्धा हिंदी सक्तीचा  आदेश जीआर त्यांनी काढलेला आहे. तो फक्त मुंबई महानगर महापालिकेचा हिंदी भाषिकांना डोळ्यासमोर ठेवून मराठीचा द्वेष धरून त्यांनी हिंदी सक्तीचा आदेश काढला आहे. जीआर मध्ये स्पष्ट म्हटला आहे की अनिवार्य आहे. हिंदी भाषा ही अनिवार्य आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना या महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी, मराठी माणसांना न्याय देण्यासाठी केली.पण या सरकारने महाराष्ट्राची अस्मिता कधीच धुळीस मिळवलेली आहे. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या दावणीला बांधलेली आहे. पण आता ते मराठीवर सुद्धा ते आक्रमण करतात आणि हिंदी बरोबर ते पुढे आणतात आणि मराठीला दुय्यम स्थान देतात या मराठी द्वेषटी सरकारचा आम्ही निषेध करतो. आज या जीआरची होळी झालेली आहे. या सरकारची होळी महाराष्ट्रातील जनता मराठी जनता, केल्याशिवाय राहणार नाही. अनिवार्य म्हणजे ती सक्तीने केली आहे त्याचा आम्ही आज निषेध करतो.असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी म्हटले.

मनसेचे बंडू देशमुख यांनी सांगितले  १०६ हुतात्म्यांनी आपला बलिदान दिल्यानंतर  हा महाराष्ट्र आम्हाला मिळाला. रक्त सांडल्यानंतर मुंबई आम्हाला मिळाली.आणि या मुंबईवर परप्रांतीची सत्ता आणण्याचा जे काम हे भाजप सरकार करते त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय.: मुळामध्ये हा जो जीआर काढला आहे हा जीआर मराठीच्या विरोधामध्ये आहे, महाराष्ट्राच्या विरोधामध्ये आहे मराठी भाषिकांच्या विरोधामध्ये आहे असे बंडू देशमुख म्हणाले .

यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे,कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू व भिमसेन मोरे, मनसेचे सचिन कदम, बंडू देशमुख, प्रदीप गोडसे ,मुकेश सेठपलानी, शिवसेना शहर प्रमुख कुलविंदरसिंह बैंस व कैलास तेजी मा.नगरसेविका वसुधा बोडारे, शहर संघटिका जया तेजी, विधानसभा उपप्रमुख शिवाजी जावळे,विधानसभा संघटक कृष्णा पुजारी, महेश फुंदे युवासेना शहर अधिकारी महेश फुंदे,उपशहर प्रमुख शेखर यादव,मधुकर साबळे,राजन वेलकर,दिलीप मिश्रा,भगवान मोहिते,राजू माने व सुरेश पाटील,उपशहर संघटक विजय सावंत, विभाग प्रमुख रमेश घोंगडे, उपविभाग प्रमुख प्रा.प्रकाश माळी, अनिल लोंढे व आदिनाथ पालवे, सुरेश देशमुख  ,विभाग संघटक निवृत्ती पाटील,युवा सेने, महिला आघाडी, शिवसैनिक व मराठी प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संध्याकाळी सरकारने जीआर रद्द केल्याचे कळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व मनसेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. तर मनसेने हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी रात्री उल्हासनगरातील मनसे लालगड शाखा उल्हासनगर – ४  व कॅम्प  नंबर ३ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक उल्हासनगर ३ येथे जीआर रद्द झाल्यामुळे फटाके फोडत पेढे वाटून विजय उत्सव साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

error: Content is protected !!