Homeशहरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

  • विठुनामाच्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे दि. १९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी….  ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान केले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली. महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबरनाथ पोलिसांची मोठी कारवाई ; ८६ हजार रुपयांचा साडेतीन किलो गांजा जप्त, एकाला...

अंबरनाथ दि. २१ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत तब्बल ३,.४५७  किलो गांजा जप्त...

‘हे लाजिरवाणे आहे’: व्हायरल क्लिप समोर आल्यानंतर अर्जेंटिनाचे विश्वचषक अंतिम आचार ताज्या छाननीखाली

अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिस (२४) याला लाल कार्ड दाखविल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी विरोध केला (एपी फोटो) एंझो फर्नांडीझच्या निर्णायक रेड कार्डच्या परिणामावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न...

बोरिवलीत दुचाकीस्वाराला टाळताना बेस्ट बसने दुभाजक लावले, कोणतीही दुखापत झाली नाही

मुंबई: बोरिवली पूर्व येथे सोमवारी रात्री उशिरा बेस्टची बस रस्त्याच्या दुभाजकावर अडकली. दौलत नगर बसस्थानकाजवळ रात्री 11.20 च्या सुमारास ही घटना घडली...

पुणे खून प्रकरण: लग्नाला उशीर करण्यासाठी सिया आणि चेतनने सुरुवातीला केतनला जखमी करण्याची योजना...

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालच्या लग्नाला उशीर करण्यासाठी त्याला जखमी करण्याची योजना आखली पुणे: सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर,...

भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस मार्ग जे प्रत्येक प्रवाशाला माहित असले पाहिजेत |

भारताचे वंदे भारत एक्सप्रेस नेटवर्क 2019 लाँच झाल्यापासून लक्षणीयरीत्या विस्तारले आहे. अजनी ते पुणे हा मार्ग आता देशातील सर्वात लांब वंदे भारत प्रवास...

error: Content is protected !!