Homeताज्या बातम्यामुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या मराठी विजय मेळाव्याला मराठी प्रेमींची प्रचंड गर्दी

मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या मराठी विजय मेळाव्याला मराठी प्रेमींची प्रचंड गर्दी

  • बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं – राज ठाकरे
  • एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं- उद्धव ठाकरें

मुंबई दि ५ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर पहिलीपासून हिंदी सक्तीच्या  मुद्द्याविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध केला होता, यानंतर राज्य सरकारने जीआर रद्द केला. हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द करायला लावल्यानंतर आज मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या वतीने मराठी विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत . तब्बल २० वर्षांनी आज मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. वरळीच्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख   राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे हे दोन भाऊ मंचावर एकत्र दिसले. या मेळाव्यामध्ये सुरुवातीचं भाषण राज ठाकरे यांनी केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास ठाकरी शैलीमध्ये जोरदार टोला लगावला. जे बाळासाहेबांना जमलं नाही, इतरांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं, असे राज ठाकरे म्हणाले.

ठाकरे बंधू यांच्यातील पहिले भाषण राज ठाकरे यांनी केले. त्यांनी आपले दमदार भाषण संपवल्यानंतर ते जागेवर बसण्यासाठी गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे  यांनी राज ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर टीका करणारे ठाकरे बंधू यांच्यातील प्रेम दिसून आले. त्यात सुरुवातीला राज ठाकरे आपल्या खुर्चीवर बसायला गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे  यांनी त्यांना हस्तांदोलन केले. त्यानंतर लगेचच ते त्यांच्याशी काहीतरी बोलले आणि अखेर त्यांनी राज यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

वरळीत एनएससीआय डोम येथे असलेल्या या सभेला  मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती  तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता . या पार्श्वभूमीवर भाषण करताना राज ठाकरे यांनी या विजयी सभेतून जोरदार टोलेबाजी केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी  माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो, याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचाही मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे. आज २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर आलो. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं विधान राज ठाकरे यांनी या सभेच्या निमित्ताने झालेल्या ठाकरे बंधूंच्या ऐक्यावरून केलं.राज ठाकरे पुढे म्हणाले की, इथे चॅनल्सचे कॅमेरे लागलेले आहेत.

आता  संध्याकाळी  सगळं सुरू होईल. दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कुणी कमी हसलं का, कुणी कमी हसलं का,  बोलताहेत का. आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच अनेकांना रस असतो, असा टोलाही राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.या सभेसाठी कुठलाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा, असं ठरलं होतं. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही. खरं तर सध्या हिंदीवरून निर्माण झालेला हा प्रश्नच अनाठायी होता. महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती लादण्याची काही गरज नव्हती. कशासाठी आणि कुणासाठी तुम्ही लहान मुलांवर हिंदी भाषेची सक्ती करताय. कुणाला विचारायचं नाही,शिक्षण तज्ज्ञांना विचारायचं नाही. आमच्याकडे सत्ता आहे आम्ही लादणार हे यांचं धोरण होतं. पण तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात. इथे आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर आहे, असं सूचक विधान राज ठाकरे यांनी केलं.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं उद्धव ठाकरे

मंचावर यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो असल्याचं म्हटलं. यावेळी संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार हिंदीच्या विषयावरून जोरदार निशाणा साधला. “आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय. भाषेवरून जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो वरवरचा धरुन चालणार नाही. मध्यंतरीच्या काळात आपण सर्वांनीच या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे, वापरायचं आणि सोडून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार. डोक्यावर शिवसेना प्रमुखांचा हात नसता तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होतं,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकेचा बाण सोडला.”भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. मधल्या काळात त्यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट, कट्टर, देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय. ९२-९३ मध्ये जे काही घडलं तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांनाही हिंदू म्हणून शिवसैनिकांनी मराठी माणसानं वाचवलं. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला.

तब्बल दोन दशके एकमेकांशी वितुष्ट असल्यासारखे वागणारे राज आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय आज एकत्र एकाच मंचावर दिसून आले. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रातील सर्व बड्या नेतेमंडळींना मंचावर बोलावले. त्यांचे आभार मानले आणि त्यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यानंतर राज आणि उद्धव यांचे कुटुंबीय देखील एकाच व्यासपीठावर आले आणि एक उत्तम फॅमिली फोटो दिसला. राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे सर्वांनी एकत्रित उभे राहून फॅमिली फोटोसाठी पोज दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड , जयंत पाटील मंचावर उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

error: Content is protected !!