उल्हासनगर दि २७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील मा. महापौर व स्थानिक मा. नगरसेविका सौ राजश्री चौधरी यांनी पॅनल क्रमांक १० मधील पवई परिसरात दौरा करून काही नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या लवकरच सोडण्यात येतील असे आश्वासन त्या परिसरातील नागरिकांना दिले.

सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात काही ठिकाणी पाण्याची समस्या ही आहे. याशिवाय खड्डामाई झालेल्या रस्त्यांमुळे किरकोळ अपघाताच्या ही घटना घडत आहेत. याशिवाय काही ठिकाणी पाण्याला जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणीदेखील तुंबात असतो. शहरातील कॅम्प नंबर ३ परिसरातील पवई येथील पॅनल क्रमांक १० मध्ये काही नागरिकांना विविध समस्या होत्या. याबाबत त्यांनी मा. महापौर व स्थानिक मा. नगरसेविका सौ राजश्री चौधरी यांच्याकडे या समस्या बाबत सांगितले होते. आपल्या वार्डातील नागरिकांना नक्की कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी भर पावसात सौ राजश्री चौधरी यांनी पवई परिसरात पाहणी दौरा केला. त्या परिसरातील काही नागरिकांसोबत चर्चा करून त्यांना काय समस्या आहेत याची परिपूर्ण माहिती सौ राजश्री चौधरी यांनी घेतली. याशिवाय नागरिकांना ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे आश्वासन देखील त्यांनी दिले. पॅनल क्रमांक १० परिसरातील नागरिकांच्या आजवर अनेक समस्या सौ राजश्री चौधरी यांनी सोडवले आहेत. याशिवाय ते महापौर असताना देखील आपल्या प्रभागात व शहरात दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या तातडीने सोडवला देखील आहेत.त्यावेळी मा. महापौर व स्थानिक मा. नगरसेविका सौ राजश्री चौधरी यांच्यासोबत जनसेवक रवी निकम हे देखील होते.





























