Homeशहरएसएसटी महाविद्यालयात सेबीच्या मार्गदर्शनात गुंतवणूक प्रबोधन वर्ग — प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मिळाली...

एसएसटी महाविद्यालयात सेबीच्या मार्गदर्शनात गुंतवणूक प्रबोधन वर्ग — प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मिळाली गुंतवणुकीची सखोल माहिती

उल्हासनगर दि. १ : “पैसा कमविण्याइतकंच, योग्य गुंतवणूक करून तो वाढवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे,” या विचाराला मूर्त स्वरूप देत एसएसटी महाविद्यालयाच्या आयक्यूएसी आणि कॅपॅसिटी बिल्डींग कमिटीतर्फे सेबी (SEBI) च्या सहकार्याने प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूकदार प्रबोधन वर्गाचे आयोजन केले.

महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये आयोजित या मार्गदर्शन सत्रात सेबीच्या मान्यताप्राप्त प्रशिक्षक डॉ. सारिका लोहाना यांनी उपस्थितांना गुंतवणुकीचे महत्त्व, विविध गुंतवणूक साधने, शेअर बाजार, म्युच्युअल फंड्सचे प्रकार, तसेच गुंतवणुकीसंबंधी कायदे व नियम यांची सखोल माहिती दिली. उदाहरणांसह सादर केलेल्या या माहितीमुळे उपस्थितांमध्ये गुंतवणूकबाबत जागरूकता वाढली असून भविष्यकाळात योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास मिळाल्याच्या प्रतिक्रिया प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी दिल्या. ही संकल्पना महाविद्यालयाचे चेअरमन आणि संस्थापक प्राचार्य डॉ.पूरस्वानी यांची असून, त्यांच्या पुढाकारातून आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात आला.

यापूर्वीही महाविद्यालयात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून प्राध्यापक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी गुंतवणूकदार जागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. दीपक गवादे, डॉ.संतोष करमानी  तसेच उपप्राचार्य आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे आणि अन्य प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले. हा उपक्रम आर्थिक साक्षरतेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमनच्या कार्यालयावर आणि दोन फ्लॅटवर हातोडा

मुंबई: मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या तेहतीस वर्षांनंतर, टायगर मेमन याच्या 1992-93 च्या जातीय दंगलीत जाळण्यात आलेल्या त्याच्या माहीम कार्यालयासह त्याच्या तीन मालमत्तांचा मंगळवारी...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

कॉर्न-हस्क पिट ते CWG गौरवापर्यंत: सर्वेश कुशारेचा ऐतिहासिक उंच उडीपर्यंतचा प्रवास रौप्यपदक | राष्ट्रकुल...

सर्वेश कुशारे (इमेज क्रेडिट: एक्स) देवगाव येथील कॉर्न-हस्क लँडिंग पिटपासून ते भारतातील सर्वोत्कृष्ट CWG पुरुषांच्या उंच उडीपर्यंत, राष्ट्रीय विक्रम-धारक सर्वेश कुशारेला शेवटी मोठ्या...

मायकेलएंजेलोचे दिवसाचे कोट: “प्रतिभा म्हणजे शाश्वत संयम”

मायकेलएंजेलोचे कोट अलौकिक बुद्धिमत्तेला शाश्वत संयम म्हणून हायलाइट करते, केवळ जन्मजात प्रतिभा नाही. त्यांचे जीवन विलक्षण कलात्मक कामगिरीमागे प्रचंड मेहनत दाखवते. आधुनिक समाज...

मानहानीच्या खटल्यात मुंबईतील विकासकाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे

एसडी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाला लक्ष्य करणाऱ्या कथित बदनामीकारक सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश पुढील सुनावणीपर्यंत प्रसारित करू नयेत,...

error: Content is protected !!