Homeताज्या बातम्याउल्हासनगर धक्कादायक घटना: पत्नी व मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

उल्हासनगर धक्कादायक घटना: पत्नी व मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

  • आर्थिक परिस्थितीमुळे तणावाखाली येऊन घडून आणली ही भयानक घटना
  • मध्यरात्री पत्नी आणि मुलीची हत्या करून नंतर घेतला गळफास

 ( प्रमोद दळवी )

 उल्हासनगर दि .१५ :  आर्थिक परिस्थितीमुळे तणावाखाली येऊन कोण काय प्रकार घडून आणेल याची कोणी पुसटशीही कल्पना करू शकणार नाही. अशी हृदय पिळून टाकणारी धक्कादायक घटना उल्हासनगर मधील उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी उघडकीस आली. एका इसमाने आपली पत्नी व मुलीची हत्या करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या या खळबळजनक घटनेने उल्हासनगर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प नं- १  येथील  झुलेलाल  मंदिरा परिसरातील बेवस चौक येथे असणाऱ्या वर्षा कॉटेज या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर ही भयानक घटना घडली आहे. त्या ठिकाणी पवन पहुजा (५१ ) हे पत्नी नेहा वय (३८  ) व मुलगी रोशनी वय (१६  )  हे कुटुंब राहत होते. पवन हे राहत असलेल्या खोलीमध्ये गुरुवारी एक भयानक प्रकार उघडकीस आला. त्यांची पत्नी नेहा व मुलगी रोशनी हे घरात निश्चित अवस्थेत पडलेले होते तर पवन याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. हा प्रकार उल्हासनगर पोलिसांना कळतात त्यांनी पवन यांच्या घराकडे धाव घेतली. तिघांच्याही मृतदेहांचा इन्वेस्ट पंचानामा करून ते मृतदेह  शिविच्छेदनासाठी उल्हासनगरतील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पवन हे एक हुशार कारागीर होते. उल्हासनगरातील सोनार गल्लीत एका दुकानात ते सोन्या-चांदीचे दागिने बनवून देण्याचे काम करीत असे. तर त्यांची मुलगी नेहा ही नुकताच दोन दिवसांपूर्वी परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली होती. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने पवन हे नेहमी चिंताग्रस्त राहत होते. काही महिन्यापूर्वी त्यांच्या एका ओळखीच्या इसमाने त्यांच्याकडून ७०० ते ८०० ग्रॅम सोने घेऊन त्यांची फसवणूक केली असलायचे बोलले जात आहे . तेव्हापासून ते आर्थिक संकटात सापडले होते. आर्थिक परिस्थितीमुळे ते नेहमी तणावाखाली होते. याशिवाय सहा महिन्यापूर्वी त्यांच्या मुलाचाही आकस्मात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या आणखीनच खचून गेले होते.

पोलीस तपासात अशी माहिती मिळाली आहे की पवन पहुजा याने बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पत्नी नेहा व मुलगी रोशनी हे गाढ झोपेत असताना त्या दोघींचाही गळा आवळून  त्यांनी त्यांना ठार मारले त्यानंतर त्याने स्वतःचे ही जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने घरात गळफास घेऊन  आत्महत्या केली. त्याआधी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यात आपण आर्थिक परिस्थितीमुळे तणावाखाली येऊन आत्महत्या करीत असल्याचे सांगितले आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची या खळबजनक  घटनेने उल्हासनगरात  खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ते तिन्ही मृतदेह पवन याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत.  पवन याने हा धक्कादायक प्रकार का घडून आणला आहे. नक्की या घटनेमागचं काय कारण आहे याचा तपास अधिक पोलिसांनी सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्कॅमरना APK फाईल्स तयार करून विकल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधील विज्ञान पदवीधराला अटक केली

मुंबई: डीबी मार्ग पोलिसांनी 26 वर्षीय विज्ञान पदवीधर एसके मंडल याला पश्चिम बंगालमधील फसवणूक करणाऱ्यांना एपीके फाइल्स तयार करून विकल्याच्या आरोपाखाली अटक...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

‘पहा कोण बोलतंय’: माजी फिफा बॉसने वर्ल्ड कप $20 अब्ज सेलआउट योजनेवर हल्ला केला,...

फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी विश्वचषक गुंतवणूक योजनेवर टीका केली कारण चाहत्यांनी त्यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केला/ प्रतिमा: एपी FIFA चे माजी अध्यक्ष...

स्टीव्ह जॉब्सचे दिवसाचे कोट: “उत्कृष्ट कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर...

स्टीव्ह जॉब्स (फोटो: stevejobsarchieve) स्टीव्ह जॉब्सचे जीवन प्रेरणा घेण्यासारखे आहे; वारंवार धक्के सहन करूनही बळकट कसे परत यायचे आणि त्याचा पुरेपूर फायदा कसा...

पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रीय कार्यशाळेत सायबर गुन्हे, पीडित केंद्रीत पोलीसिंग केंद्रस्थानी

प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, विद्यार्थ्यांनी सामाजिक बदलामध्ये तरुणांची भूमिका, स्क्रीनशॉट यावर चर्चा केली पुणे: कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासाचा दर्जा आणि गती सुधारण्यासाठी...

error: Content is protected !!