Homeशहरउल्हासनगरात नाल्यावरील कोसळलेल्या पुला संदर्भात पालिका प्रशासना विरोधात अनोखे आंदोलन

उल्हासनगरात नाल्यावरील कोसळलेल्या पुला संदर्भात पालिका प्रशासना विरोधात अनोखे आंदोलन

उल्हासनगर दि.२० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील गणेश नगर भागात जून महिन्यात मुसळधार पावसामुळे नाल्यावरील पूल कोसळला होता या घटनेला आता एक महिना उलटला असतानाही प्रशासनाने पुलाची पुनर्बांधणी केली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांचे भावना पुन्हा उफाळून आले आहेत. या ठिकाणी राधाकृष्ण साठे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. यापूर्वी देखील त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून लक्ष वेधले होते. पूल कोसळून एक महिना झाला टेंडरची फाईल तयार आहे फक्त आयुक्तांच्या सहीची वाट पाहत बसलो आहोत आणि तोपर्यंत जनता त्रास सहन करत आहे असे राधाकृष्ण साठे यांनी म्हटले आहे

गेल्या महिन्यात मुसळधार पावसामध्ये ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी एक महिला आणि एक तरुणी वाचली. तेव्हा पालिका प्रशासनाला जाग येण्यासाठी राधाकृष्ण साठे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले होते. वृत्तपत्रात या पुलासंदर्भात बातम्या आल्यावर नगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी धावून आले. या पुलाच्या दुरुस्ती संदर्भात आश्वासन दिले. आमच्या डोळ्याचे पाणी पुसले. पण एक महिना उलटला तरी अद्याप पर्यंत या पुलाचे काम सुरू झाले नाही. या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणाहून जातात व वृद्ध महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. दिवसातून या ठिकाणी बरेच जण पडत असतात. कालच एका महिलेचा आमच्या परिसरात निधन झाल्यावर तिचे प्रेत गोधडीत धरून रोडवर न्यावे लागले. हा जर पूल तयार झाला असता तर त्यावरून ते प्रेत नेता आले असते. या पुलाची दुरावस्था आहे.

पालिकेने लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी. आयुक्ताची फक्त फाईलवर सही राहिलेली आहे. आयुक्त मॅडमला त्या फाईलवर सही करायला वेळ नाहीये. टेंडर कोटेशन तयार केले आहे. फक्त सही साठी राहिलाय म्हणून हा पूल असाच आहे. लोकं त्यावरूनच जात येत आहेत. त्यात परत कोणीही पडू शकतो. दुसरा विषय असा आहे शहरामध्ये पालिकेने असे खड्डे खोदून ठेवले आहेत ज्यांच्यामुळे महिलांना ,नागरिकांना ,ॲम्बुलन्स चालकांना , कुठलीही वाहतूक , शाळेतील मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, या सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागतो असे समाजसेवक राधाकृष्ण साठे यांनी सांगितले

या खड्ड्यांमुळे अनेक जण पडून जखमी होत आहेत. हे भयानक खड्डे बुजले पाहिजेत. याबाबत ठेकेदारांना काही घेणं देणं नाही ते आरामात बसले आहेत. पण पालिका अधिकाऱ्यांचे काम आहे या ठेकेदारांकडून खड्डे बुजून घेणं जर ते काम करत नसतील तर त्यांना सक्तीने नोटीस देणे. त्यांना महत्त्वाच्या सूचना देणं त्यांच्याकडून रस्त्यावरील खड्डे बुजून घेणे. या सर्व गोष्टीकडे पालिकेने लक्ष दिलं पाहिजे. दुसरीकडे नळाला येणारा पाणी हे गढूळ पाणी येत आहे आणि पालिका आयुक्त हे मीटर लावत आहेत. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा. या समस्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात आले आहे. पालिकेला निवेदन ही देण्यात आले आहे. कोणालाही जाग येत नाही काही व्यापारी लोकांचे व्यापार बंद झाले आहेत त्यांनी अक्षरशा  दुकान बंद केले आहेत. तीन-तीन महिने झालेत लोकांचा व्यापार नाही. अशी भयानक अवस्था झाली आहे म्हणून  हे अनोख्या पद्धतीने आंदोलन करावे लागले. महापालिकेमध्ये सर्व महिला अधिकारी आहेत ही खूप गर्वाची गोष्ट आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सम्मान अधिकार मिळाला आहे. महिला पुढे येऊन सुद्धा जर असा असेल तर ही शोकांतिका आहे. त्यामुळे मला आज असे रूप धारण करावे लागले. जेणेकरून प्रबोधन व्हावं चांगला संदेश जावा असे राधाकृष्ण साठे म्हणाले. आयुक्तपदी मॅडम आले आहेत आम्हाला गर्वाची गोष्ट आहे. आयुक्तापदी महिला अधिकारी असल्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून खूप आशा आहेत. पण आमच्या निराशा व्हायला लागल्यात. गेल्या महिन्यात मुसळधार पावसामध्ये हा पूल कोसळल्यामुळे सुमारे ५०० नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना या नाल्यावरून जाताना आपला जीव धोक्यात घालून जावं लागत आहे गणेश नगर मध्ये पूल  कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाकडून काम सुरू करण्यात आले नाही टेंडर प्रक्रिया कागदावर अडकून पडली आहे आणि त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांच्या संतापाचे वातावरण पसरले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हृदयाच्या धक्क्यानंतर मुंबईच्या डॉक्टरांनी दुर्मिळ लिपिड विकार असलेल्या अर्भकाला वाचवले | मुंबई बातम्या

मुंबई : परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी अडीच महिन्यांच्या चिमुरडीचे रक्त काढले तेव्हा ते गोठले. परिचित किरमिजी रंगाच्या ऐवजी, सिरिंज जाड,...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

अमेरिकेतील 5 शहरे जिथे 100 वर्षांपूर्वी वेळ थांबल्यासारखे वाटते

जिम थॉर्प, उर्फ ​​अमेरिकेचे स्वित्झर्लंड, त्याच्या डोंगराळ वातावरणामुळे, त्याच्या शतकानुशतके जुन्या व्हिक्टोरियन वास्तुकलासाठी ओळखले जाते. हे शहर मूळतः 19 व्या शतकाच्या सुरुवातीस माउच चंक...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

ग्लोबल चेस लीग मसुदा: मॅग्नस कार्लसन, अनिश गिरी, दिव्या देशमुख, कोनेरू हम्पी एकाच संघात...

मॅग्नस कार्लसन, अनिश गिरी, दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी ग्लोबल चेस लीग (GCL) च्या सीझन 4 साठी प्लेयर ड्राफ्टने सोमवारी भरपूर उत्साह निर्माण...

error: Content is protected !!