Homeशहरसार्वजनिक आरोग्य विभागाची पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई व नियमित स्वच्छता यासंदर्भात आढावा बैठक...

सार्वजनिक आरोग्य विभागाची पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई व नियमित स्वच्छता यासंदर्भात आढावा बैठक संपन्न

उल्हासनगर दि १८ ( प्रमोद दळवी ) : आरोग्य सभापती सौ. सविता ताई तोरणे-रगडे यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आरोग्य विभागाच्या दालनात सार्वजनिक आरोग्य विभागाची पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई व नियमित स्वच्छता यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, शिवाजी रगडे तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईचा आढावा घेतला असता प्रशासनाच्या वतीने जवळपास ७५ ते ८० टक्क्यांहून अधिक नालेसफाई पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. प्रभाग समिती क्रमांक ३ मधील वालधुनी नदी, जी कोणार्क कंपनी मार्फत स्वच्छ केली जाते, त्यांच्या कामाबाबत आरोग्य सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर्षी सफाईचे काम समाधानकारक पद्धतीने झाले नसल्याची तक्रार सभापतींनी नोंदवली. तसेच उल्हासनगर शहरातील इतर मोठ्या नाल्यांमध्ये सुरू असलेल्या सफाई कामा बद्दल देखील नाराजी व्यक्त करून पावसाळ्यात पाणी साचणे, नाले तुंबणे किंवा त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा कडक सूचना सभापतींनी दिल्या. वालधुनी नदीमध्ये पुढील दोन दिवसांत पुन्हा मशिनरी उतरवून सखोल स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले.

याशिवाय, कोणार्क कंपनीकडून शहरातील कचरा उचलण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत, याबाबतही सभापतींनी नाराजी व्यक्त केली. कचरा संकलन व्यवस्थेबाबत एक आठवड्याच्या आत सविस्तर नियोजन तयार करून पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेण्यात येईल तसेच उल्हासनगर शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत विरुद्ध अफगाणिस्तान लाइव्ह स्कोअर: चेपॉक येथे अंतिम एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलचे लक्ष्य व्हाईटवॉश,...

भारत विरुद्ध अफगाणिस्तान लाइव्ह स्कोअर: भारताने धर्मशाला आणि लखनौ येथे खात्रीशीर विजय मिळवून अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका आधीच सुरक्षित केली आहे, परंतु शनिवारी चेन्नईच्या एमए...

कुडनकुलम युनिट-5 ने अणुभट्ट्या स्थापित केल्यामुळे महत्त्वाचा टप्पा गाठला | मुंबई बातम्या

कुडनकुलम युनिट-5 येथे रिॲक्टर प्रेशर व्हेसेलच्या यशस्वी स्थापनेसह भारताच्या अणुऊर्जा विस्ताराने एक महत्त्वाचा टप्पा गाठला (AI सह प्रतिमा वर्धित) मुंबई/नवी दिल्ली: भारताने सोमवारी...

पुणे रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधून सिमकार्ड चोरणाऱ्या सिव्हिल इंजी.ला अटक

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये चार्जिंगसाठी ठेवलेल्या प्रवाशांच्या मोबाईलमधून सिमकार्ड चोरल्याप्रकरणी २३ वर्षीय सिव्हिल इंजिनिअरला अटक करण्यात आली, अशी माहिती...

लग्नाच्या दिवशीची चिनी म्हण: "जेव्हा पती-पत्नी एकाच मनाचे असतात…"

दीर्घकालीन नातेसंबंधातील वळण आणि वळणांवर टिकून राहण्यासाठी एक जुनी चिनी म्हण उत्तम प्रकारे कॅप्चर करते: "Fū qī tóng xīn, qí lì duàn jīn." भाषांतर:...

टेचीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; पती आणि सासूवर गुन्हा दाखल

पुणे : माणिकबाग परिसरात गुरुवारी दुपारी एका २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने रहिवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.मृताच्या भावाने सिंहगड रोड पोलिसांकडे दिलेल्या...

error: Content is protected !!